Sachin Sawant has criticized Pm Modi for greeting the citizens from the running metro in pune  esakal
महाराष्ट्र बातम्या

मोदींचं धावत्या मेट्रोमधून अभिवादन; सचिन सावंत म्हणतात, "तुच्छ जनता.."

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज रविवारी मेट्रोसह (Metro) विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनासाठी पुणे दौऱ्यावर आले. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी आज रविवारी पुणे मेट्रोच्या विस्ताराचे उद्घाटन केले आणि यानंतर त्यांनी तिकीट काढून मुलांसोबत मेट्रो ट्रेनमध्ये प्रवास देखील केला. मात्र या मेट्रो प्रवासामुळे पंतप्रधानांवर जोरदार टीका होत आहे.

या मेट्रो प्रवासातील एक छोटासा व्हिडीओ कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विट केला आहे. या व्हिडीओत पंतप्रधान मोदी हात हालवून अभिवादन करताना दिसत आहेत. सावंत यांनी या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, 'मोदीजी धावत्या मेट्रोमधून हात हलवून अभिवादन करत आहेत, तुच्छ जनता पाहू शकली नाही तर काय झालं? पण भक्त आंतरिक दृष्टिने नक्की पाहू शकत असतील'

पंतप्रधानांच्या ट्विटर हँडलवरून मेट्रोच्या प्रवासात मोदींसोबतचे त्या मुलांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. पंतप्रधानांनी पुण्याच्या गरवारे कॉलेज स्टेशन ते आनंद नगर स्टेशन असा मेट्रोचा प्रवास केला. दरम्यान पंतप्रधानांच्या या मेट्रो प्रवासादरम्यान त्यांनी दिव्यांग मुलांशी तसेच शालेय गणवेश घातलेल्या मुलांशीही संवाद साधला आहे. मात्र, त्यावर देखील जोरदार टीका होत आहे. तसेच त्यांच्यावर मीम्स देखील व्हायरल होत आहेत.

पंतप्रधानांसोबत प्रवास करणाऱ्या त्या शाळकरी मुलांनी त्यांच्या शाळेचा गणवेश घातलेला आहे त्यावर, आज रविवार असतानाही ही मुले शाळेला का जात आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे, पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्यामधील वाहतूक मार्गातील प्रत्येक दुकानं बंद, हॉटेल्स देखील दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आल्यावरही टीका होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT