political esakal
महाराष्ट्र बातम्या

'अनिल देशमुखांच्या वकीलाला एक अन् सोमय्यांना दुसरा न्याय कसा?'

गोपनीय माहिती मंत्रीमंडळ टिप्पणी शासनाला न देता सोमय्यांना कशी मिळाली? - अजित सावंत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंत्रालयात जाऊन कर्मचाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल तपासल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी (CM Uddhav Thackeray) घेतली दखल घेतली असून मुख्य सचिव यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आक्रमक झाले असून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टीका केली. 'मविआ सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?' असा सवालही त्यांनी केला. दरम्यान त्यांच्या या सवालावर कॉंग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी प्रतित्त्युर दिले आहे.

ते म्हणतात, देवेंद्र फडणवीस तुमच्या कार्यकाळात RTI तून माहिती मिळवण्यासाठी माहिती आयुक्तांपर्यत जावे लागत होते. आता अर्ज करुन राजरोसपणे पाहता येते. गोपनीय माहिती मंत्रीमंडळ टिप्पणी शासनाला न देता सोमय्यांना कशी मिळाली? CBI च्या PE अहवालाबाबत अनिल देशमुखांच्या वकीलाला एक व सोमय्यांना दुसरा न्याय कसा? असा उलट सवाल त्यांनी केला आहे.

दरम्यान, काल किरीट सोमय्या मंत्रालयातील नगर विकास खात्यात गेले असता तिथे ते शासकीय कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसले आणि त्यांनी काही फाईल्स बघितल्या. फाईल्स चेक करतानाचे किरीट सोमय्या यांचे हे मंत्रालयातील फोटो व्हायरल झाले आहेत. यानंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशी आदेश दिले. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मविआ सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? माहिती अधिकारात फाईलचे निरीक्षण करण्यासाठी गेले तर त्यासाठी थेट माहिती मागणार्‍यालाच नोटीस! या अक्कलशून्य सरकारने संपूर्ण लोकशाहीच पायदळी तुडविली आहे. किरीट सोमय्यांना नोटीस कसली देता, ही नोटीस द्यायला सांगणार्‍या बोलवित्या धन्यावर कारवाई करा!, अशी प्रतिक्रिया दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT