Sachin Sawant and Devendra Fadnavis टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

"उत्तर भारतीयांना गावोगावी पाठवण्याची फुशारकी मारणारे भाजप नेते आज गप्प का?"

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर ट्वीटद्वारे ताशेरे ओढले.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल सोमवारला करोनाचा प्रादूर्भाव वाढण्यास घाणेरडे राजकारण आणि महाराष्ट्र सरकारही (Maharashtra Government) जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यांनी केलेल्या या आरोपाला महाराष्ट्राच्या राजकीय स्तरातून प्रतिक्रीया उमटत आहे. यातच काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजपवर ट्वीटद्वारे ताशेरे ओढले.

सचिन सावंत म्हणतात, “मोदीजींचे म्हणणे आहे की मुंबईतील उत्तर भारतीयांनी कोरोना पसरवला. त्यावेळी उत्तर भारतीयांना गावोगावी पाठवण्याची फुशारकी मारणारे भाजप नेते आज गप्प का आहेत? मोदींनी कोरोना सुपरस्प्रेडर म्हणत उत्तर प्रदेश आणि बिहारच्या जनतेचा अपमान केला आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागावी.” सोबत देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) एक जुना व्हिडीओ सुध्दा सावंतानी पोस्ट केलाय. त्यात फडणवीस केंद्र सरकारकडून वेळोवेळी ट्रेन उपलब्ध करण्याबाबत सांगताना दिसत आहे.

समोर आणखी एक ट्वीट करत सावंत म्हणाले, “उत्तर प्रदेश आणि बिहारच्या जनतेनी पंतप्रधान आणि भाजपच्या मनात त्यांच्याबद्दल किती आदर आहे, हे देखील समजून घेतले पाहिजे. मुंबई महानगरपालिका आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला या अपमानाचे सडेतोड उत्तर मिळेल.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-New Zealand FTA: 20 ऑक्टोबरपासून दारू होणार स्वस्त! भारत-न्यूझीलंड FTA मुळे तुम्हाला काय फायदा?

Tempo Bike Accident : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलला पाठीमागुन उडविल्याने एक जणाचा मृत्यू; तर एकजण जखमी

Marathi News Live Updates: पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Pitru Paksha 2026: यंदा पितृ पंधरवडा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तिथी

Marathwada Drought : पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल;सोयाबीनला पाणी देण्याची धडपडही निष्फळ; आर्थिक संकट गडद

SCROLL FOR NEXT