Political
Political esakal
महाराष्ट्र

'वारकऱ्यांमध्ये संघ भक्त परायण घुसलेत; दडवली तरी बोलण्यातून चड्डी दिसतेच'

स्नेहल कदम

सध्या बंडातात्या कराडकर हे नाव चांगलंच चर्चेत आलं आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि लोकप्रतिनिधी महिलांबाबत बेताल वक्तव्य केली आहेत. याप्रकरणी कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांच्यावर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी टिकेची झोड उठवली आहे. कराडकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणीही होत आहे. दरम्यान, आता कॉंग्रेसच सचिन सावंत (Sachin Sawant) यांनीही त्यांच्यावर नाव न घेता ट्वीटद्वारे निशाणा साधला आहे.

ट्वीटमध्ये सावंत म्हणतात, टिळा टोपी घालुनी माळा । म्हणती आम्ही साधू ॥ दयाधर्म चित्ती नाही। ते जाणावे भोंदू ॥ वारकरी संप्रदायात काही संघ भक्त परायण घुसले आहेत, जे ह.भ.प. म्हणवून घेतात. कितीही दडवली तरी बोलण्यातून चड्डी दिसतेच. समाजात विष पसरवण्याचा यांचा डाव आहे. तुकाराम महाराजांनीच याबाबत सावध केले आहे, असा टोला त्यांनी कराडकर यांना नाव न घेता लगावला आहे.

दरम्यान, बंडातात्या कराडकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या ते राजकीय (Political News) वर्तुळाच्या चर्चेतही दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाच्या पूजेला येण्याचा टाळावं. ज्या पद्धतीने गेले चार महिने वारकऱ्यांचे आंदोलन गुंडाळण्यात आली त्यावरून महाराष्ट्रात (Maharashtra) भगव्या झेंड्याच राज्य आहे, असे वाटत नाही. भगव्या झेंड्याचा अपमान सुरू असून, वारकऱ्यांच्या पताका, टाळ, चिपळ्या काढून घेतल्या जातात. वारकऱ्यांच्या पोशाखात चालू नका असा पोलिस दम देतात. दडपशाहीने महाराष्ट्रातील पायीवारी सोहळे आपण रद्द केले. त्यामुळे तुमची पूजा पांडुरंग स्वीकारेल, असे वाटत नसल्याचा हल्लाबोल त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT