politics esakal
महाराष्ट्र बातम्या

'अयोध्या दौऱ्याला विरोध करणारा हा ट्रॅप महाराष्ट्रातील भाजपचा'

'अयोध्या दौऱ्यावरून ज्या घडामोडी घडल्या त्याला महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आलीये'

सकाळ डिजिटल टीम

'अयोध्या दौऱ्यावरून ज्या घडामोडी घडल्या त्याला महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आलीये'

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा आयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. तब्येत ठीक नसल्याने आयोध्या दौरा तुर्तास स्थगित केल्याची माहिती मिळत होती. आज राज ठाकरे यांची यासंर्भात पुण्यात सभा झाली. यावेळी त्यांनी अयोध्या दौरा का रद्द केला? याचं कारण सांगितलं. अयोध्या दौऱ्यावरून ज्या घडामोडी घडल्या त्याला महाराष्ट्रातून रसद पुरविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

राज ठाकरे यांच्या सभेनंतर आता महाविकास आघाडीतून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अयोध्या दौऱ्याच्या या वादात आता कॉंग्रसेच्या सचिन सावंत यांनी उडी घेतली असून मी सांगितले ते सत्य ठरले, असे म्हणत त्यांनी एक ट्विट केलं आहे. अयोध्येत गेलो असतो तर केसेस टाकल्या असत्या, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. मात्र कोणी केसेस टाकल्या असत्या तर योगी सरकारने. कारण तिथे युपीमध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार असणार नाही. त्यामुळे त्यांच्या आयोध्या दौऱ्याला विरोध करणारा हा ट्रॅप महाराष्ट्रातील सरकारचा नसून भाजपाचाच आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपानेच हा ट्रॅप टाकला असे अप्रत्यक्षरित्या राज ठाकरे यांचेही मत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पुढे सावंत म्हणतात, अयोध्या दौऱ्याविरोधात रसद पुरवली असल्याचा ते आरोप करतात. महाराष्ट्रातून-भाजपा खासदारानेच विरोध केल्याने हा थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर आरोप आहे. मग मोदींकडे मागणी का केली असावी..काहीही असो... हा सगळा केमिकल लोच्या आहेच बरं, अस म्हणत त्यांनी राज ठाकरेंना डिवचंल आहे.

दरम्यान, आजच्या पुण्यातील सभेत राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांना सवाल केले. राज ठाकरे आंदोलन अर्धवट सोडतात यावरीही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला एक आंदोलन दाखवा जे अर्धवट सोडलं. टोल नाक्यापासून सर्वच आंदोलन यशस्वी झाले. तुमच्या अंगावर एकतरी आंदोलन केल्याचा गुन्हा आहे का? हे उद्धव ठाकरेंनी सांगावं, असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना केला आहे. याशिवाय त्यांनी शरद पवारांवरही टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT