Sachin Waze Allegations Anil Deshmukh e sakal
महाराष्ट्र बातम्या

मला आणि माझ्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका : सचिन वाझे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे पावरफुल व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्यानंतरही माझ्यावर त्यांच्या काही लोकांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर दबाव टाकून मानसिक त्रास देणाऱ्यांची नावे मी घेणार नाही. कारण मला आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण होईल, असे खळबळजनक आरोप सचिन वाझेनी (Sachin Waze) केले आहेत.

सचिन वाझेने उलट तपासणीवेळी चांदीवाल आयोगाला सांगितलं होतं की, अनिल देशमुख यांनी त्याला बार आणि आस्थापणाकडून वसुलीचे आदेश दिले नव्हते. मात्र, आता हा जबाब मागे घेण्यासाठी परत चांदीवाल आयोगात अर्ज केला आहे. यामध्ये देशमुखांनी मला वसुलीचे आदेश दिले होते आणि वसुल केलेले पैसे त्यांच्या लोकांना दिले, असा आरोप वाझेनी केला आहे.

देशमुखांच्या सहकाऱ्यांनी मला वसुलीसंदर्भात सूचना केल्या आहे. मला तळोजा तुरुंगात ठेवण्यात आल्यापासून गरजेच्या वैद्यकीय बाबी पुरवल्या नाहीत. मला गोरेगावच्या प्रकरणामध्ये गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी प्रचंड मानसिक त्रास दिला. माझी अँजिओप्लास्टी झाल्यानंतरसुद्धा मला उपचार देण्यास टाळाटाळ करण्यात आली. मला आणि परमबीर सिंग यांना खोट्या खडणीच्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं, असेही खळबळजनक आरोप वाझेनी केले आहेत.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर शंभर कोटी वसुलीचे आरोप करून खळबळ उडवली होती. त्यानंतर देशमुखांनी राजीनामा दिला होता. सध्या देशमुख पोलिस कोठडीत असून सचिन वाझे आणि देशमुखांची चांदीवाल आयोगाकडून चौकशी सुरू आहे. देशमुखांनी पोलिस बदल्यांमध्ये खरंच घोटाळा केला का? याचा तपास देखील चांदीवाल आयोग करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT