Sachin Waze  e sakal
महाराष्ट्र बातम्या

Sachin Waze : सीबीआय तपास करत असलेल्या प्रकरणात सचिन वाझेला जामीन

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः खंडणी प्रकरणात जेलमध्ये असलेल्या सचिन वाझेला जामीन मंजूर झाला आहे. सीबीआय तपास करत असलेल्या प्रकरणात हा जामीन मंजूर झाला.

मागच्याच आठवड्यात मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेचा जामीन अर्ज एनआयए कोर्टाने फेटाळून लावला होता. आज त्याला सीबीआयच्या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.

दोन वर्षांपूर्वी गाजलेलं अँटिलिया प्रकरण फारच गुंतागुंतीचं झालं होतं. 25 फेब्रुवारी 2021 रोजी, मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर एक महिंद्रा स्कॉर्पिओ आढळली होती. ज्यामध्ये तब्बल 20 जिलेटिनच्या कांड्या असलेली बॅग आढळून आली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली.

 या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्च रोजी मुंब्राजवळील खाडीत सापडला होता. प्रकरणाचे धागेदोरे सचिन वाझे याच्यापर्यंत येऊन ठेपले होते.

या प्रकरणात वाझेवर कथित शंभर कोटी रुपयांच्या खंडणीची केसदेखील सुरु. सीबीआय तपास करत असलेल्या प्रकरणामध्ये आज वाझेला जामीन मंजूर झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT