sachin-vaze Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

सचिन वाजे 'त्या' गोष्टींसाठी रोज घ्यायचे अनिल देशमुखांची भेट - परमबीर सिंह

या प्रकरणात रोज वेगवेगळ्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

अँटिलिया प्रकरणात (Antilia Case) दररोज वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. मुंबईचे (Mumbai) माजी पोलीस आयुक्त आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची राळ उठवली आहे. परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी आता आणखी धक्कादायक आरोप केला आहे. मुंबईतील मोठ्या गुन्ह्यांसंदर्भात सचिन वाजे (Sachin Vaze) दररोज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटत असल्याचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाजे हे मुंबई पोलीस दलातील सीआययू पथकाचे इन्चार्ज असताना त्यांच्याकडे TRP, DC कार प्रकरण, क्रिकेट बेटिंग प्रकरणासारखे गंभीर गुन्हे तपासासाठी देण्यात आलेले होते. या गुन्ह्यातील तपासाची माहिती वाजे गृहमंत्र्यांना द्यायचे. तसंच त्यांच्याकडून येणाऱ्या सुचनांप्रमाणे ते काम करत होते असं समजतंय.

दुसरीकडे वाजेला आपण ओळखतच नसल्याचा दावा अनिल देशमुख यांनी चांदिवाल आयोगाकसमोर केला होता. फक्त अनिल देशमुखच नाही तर परिवहन मंत्री अनिल परब हे सुद्धा वाजेच्या थेट संपर्कात असून SBUT प्रकरण आणि पालिकेतील कंत्राटदारांबाबत आलेल्या तक्रारींवर लक्ष घालण्यास परब यांनी सा़गितल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

Pune Drone Cluster: पुण्यात ड्रोन अन् खाद्यप्रक्रिया क्लस्टर; राज्यातील पहिलाच उपक्रम, भोसरी, हडपसरमध्ये सुरू होणार प्रकल्प!

Pandharpur News: पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध; सुब्रह्मण्यम स्वामींच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी बाधितांचा शंखनाद!

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

SCROLL FOR NEXT