sadabhau khot  esakal
महाराष्ट्र बातम्या

...नाहीतर पेपर फोडायला कसे मिळाले असते? सदाभाऊंचे सरकारवर टीकास्त्र

सदाभाऊ खोत यांनी ही महाविकास आघाडीला धारेवर धरले आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यभरात गाजत असलेले म्हाडा(Mhada),आरोग्य विभाग(Health Department)आणि शिक्षक पात्रता (TET)या परीक्षांच्या पेपर फुटीमुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. याप्रकाराची चौकशी ‘सीबीआय’मार्फत व्हावी यासाठी न्यायालयात जाणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी आज विधानसभेत दिला. त्यानंतर रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी ही महाविकास आघाडीला धारेवर धरले आहे. महापोर्टल उगाच रद्द केल नाही, नाहीतर पेपर फोडायला कसे मिळाले असते? अशी टीका त्यांनी ट्विट करत केली आहे.

परीक्षा होण्यापूर्वी पेपर फुटीमुळे प्रामाणिकपणे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. १५ डिसेंबरला याप्रकरणात पुण्यातील जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख याला अटक केली होती. त्याला साथ देणाऱ्या आणखी दोघांनाही ताब्यात घेण्यात आले होते.

दरम्यान, आज देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत इशारा दिला. परीक्षा घेणाऱ्या कंपन्या मुळातच अपात्र आणि काळ्या यादीत टाकलेल्या होत्या. तरीही त्याच कंपन्यांना परीक्षाची कंत्राटे दिली. एवढेच नव्हे तर ‘टीईटी’(tet)च्या गैरप्रकारात तर मंत्र्यांचे काही निकटवर्तीयांचाच समावेश आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणात चांगला तपास केला तर त्यांचे हात लवकरच बांधले जाणार आहेत, असा दावाही फडणवीस यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT