महाराष्ट्र बातम्या

मराठी पाट्यांवरून आरोप-प्रत्यारोप; सदाभाऊ म्हणाले, हे दुटप्पी राजकारण...

सरकारनं प्राथमिक शिक्षण मराठीतून घेतलं म्हणून मराठी शिक्षक उमेदवारांना अपात्र ठरवलं.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळाने सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत लावणे बंधनकारक असल्याचा निर्णय घेतल्या नंतर राजकिय वर्तुळात टिका-टिप्पणीला सुरुवात झाली आहे. याआधी औरंगाबादचे (Aurangabad) खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. तर आज रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य शासनावर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी सोशल मीडियावरुन हल्लाबोल केला आहे.

ते म्हणाले, अहो दुकानावर मराठी पाट्या हव्यात पण मराठी शाळा नको! ह्याच सरकारनं प्राथमिक शिक्षण मराठीतून घेतलं म्हणून मराठी शिक्षक उमेदवारांना अपात्र ठरवलं.मराठीची पोकळ कळकळ जरा समजून घ्याच! हे मराठीचं दुटप्पी राजकारण आहे. असा घणाघात सदाभाऊ खोत (Sadhabhau Khot) यांनी ठाकरे सरकावर केला आहे.

मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला ज्येष्ठ तज्ञ विलास पाटणे यांनीही मत व्यक्त केले होते. ते म्हणतात, मराठी विषय सक्तीपेक्षा अस्मितेचा करा. राज्यकर्त्यांमध्ये मराठी ही लोकभाषा, व्यवहारभाषा आणि ज्ञानभाषा म्हणून टिकावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. केवळ मराठी सक्तीच्या आणि पाट्या बदलण्याच्या कार्यक्रमातून राजकारण होईल, परंतु परिस्थिती सुधारणार नाही असेही ते म्हणाले होते.

इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) म्हणाले, असे का होते की जेव्हा-जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा तुम्ही मराठी बोर्ड, कर्नाटक सीमा वाद, मराठी अस्मिता इत्यादींबद्दल बोलतात. लोक मुर्ख नाहीत की त्यांना या नौटंकी समजत नाहीत. मराठी पाट्या लावून मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का? हा एक मिलियन डाॅलरचा प्रश्न आहे. अशी खोचक टीका त्यांनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! 'त्या' नागरिकांना परदेशी घोषित करण्याच्या आदेशाला स्थगिती

US Iran War: 'अचानक मृत्यूसाठी तयार राहा...'; लिंडसे ग्रॅहम यांच्या निधनानंतर इराणचा ट्रम्प यांना इशारा, आंतरराष्ट्रीय राजकारण तापलं

INDW vs ENGW TEST: चक दे इंडिया! भारतीय मुलींचा 'Lords' वर ऐतिहासिक विजय! कसोटीतील इंग्लंडची सर्वात मोठी हार...

Latest Marathi News Live Update : आसाम रायफल्सच्या वाहनांवर सुखोवीजवळ संशयित IED स्फोट

Bloating Hidden Health Conditions: दूध-ग्लूटेन बंद करूनही पोट फुगतंय? डॉ. सेठी सांगतात, 'हे' ४ आजार असू शकतात कारणीभूत

SCROLL FOR NEXT