Sadabhau Khot,Nana Patole Esakal
महाराष्ट्र बातम्या

नारायण राणेंना जो नियम लावला तोच पटोलेंना लावणार का? सदाभाऊ खोत

सकाळ डिजिटल टीम

काही दिवसापूर्वी नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावरून राज्यात बराच वाद उफाळला होता. त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे चांगलेच राजकारण तापले आहे. राज्यभरातून यावर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी देखील ट्विट करत नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे.

ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये जो नियम नारायण राणे यांना लावला गेला आहे. तोच नियम आता नाना पटोले यांना लागू होणार का? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला आहे. छत्री असूनही पावसात भिजणे आणि खुर्ची असूनही उभ राहणे याला खरेपणा नाही तर दांभिकपणा म्हणतात, असा निशाणा ही त्यांनी साधला आहे. जशी कारवाई नारायण राणे यांच्यावर केली गेली तशीच नाना पटोले यांच्यावरही केली जाईल का असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले नाना पटोले

‘मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते. या वक्तव्याबद्दल भाजप आक्रमक होताच त्यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली. ‘गाव गुंडाबद्दल बोलत असल्याचे’ त्यांनी यावेळी सांगितले होते.

नाना पटोले यांच्यावर कारवाईची मागणी

भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पटोलेंनी मोदींबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच त्यांना अटक करण्याची मागणी केली. नारायण राणेंनी देखील पटोलेंवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पटोलेंचा समाचार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT