Sadabhau Khot,Uddhav Thackeray Esakal
महाराष्ट्र बातम्या

सत्यमेव जयते ! खरं त्रासून जातं पण... ,सदाभाऊंचा आघाडीवर घणाघात

सदाभाऊ खोत यांचा महाविकास आघाडीवर घणाघात

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ आणि गोंधळ घातलेल्या भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) रद्द करण्यात आले. न्यायालयाच्या निर्णयावर भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या? फ्लॉवर नहीं फायर है..! असा पुष्पा या चित्रपटातील फेमस डायलाॅग ट्विट करत भाजपच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. दरम्यान सत्यमेव जयते ! खरं त्रासून जातं पण शेवटी त्याचाच जय होतो, असा टोला रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी महाविकास आघाडीवर लगावला आहे.

महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ आणि गोंधळ घातल्याने भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आले होते. या निलंबित आमदारांनी याच्याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आज (ता.२८) सुप्रीम कोर्टाकडून भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द करण्यात आले आहे. न्यायालयाच्या निर्णयावर आज भाजपचे प्रमुख नेत्यांनी महाविकास आघाडीला धारेवर धरले आहे.

सदाभाऊ खोत यांनी ट्विट करत आघाडीवर घणाघात केला आहे. ते म्हणतात, सर्वोच्च न्यायालयाने 12 आमदाराचे निलंबन रद्द केले. हा आमचा विजय आहे. सत्यमेव जयते ! खरं त्रासून जातं पण शेवटी त्याचाच जय होतो. आणि याचाच प्रत्यय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आज येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT