Sahitya Sammelan Devendra Fadnavais  
महाराष्ट्र बातम्या

Sahitya Sammelan : देशाला मार्ग दाखविणाऱ्या भूमीवर संमेलन होणे अभिमानास्पद; फडणवीसांचे गौरवोद्गार

सकाळ डिजिटल टीम

वर्धा - विदर्भ साहित्‍य संघाच्‍या शताब्‍दी वर्षानिमित्‍त अखिल भारतीय मराठी साहित्‍य महामंडळाच्‍या वतीने वर्धा येथील राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी साहित्‍य नगरीमध्‍ये 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन होत आहे. संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली. (Sahitya Sammelan news in Marathi)

फडणवीस म्हणाले, विविध संस्थांनी साहित्य क्षेत्राला आणि मराठीचे संवर्धन केले आहे. अभिमान वाटेल असेल कार्य या संस्थांनी केले आहे. वैदर्भीय नागरिक म्हणून मला याचा आनंद आहे. वर्धा नदीच्या किनारी अतिशय चांगल्या ठिकाणी हे साहित्य संमेलन आयोजित केले. अहिंसेची आणि भूदानाची भूमी असा हा संगम आहे. महात्मा गांधींनी याच ठिकाणी स्वराज्याचा निर्णय घेतला. या भूमीने देशाला मार्ग दाखविला आहे.

जेवढी पुस्तके बापूंवर लिहिले तेवढी जगातील इतर नेत्यावर लिहिण्यात आली नाहीत. त्यामुळे, संमेलन या भूमीत होणे योग्य बाब आहे. रामराज्यचा, सुराज्याचा संदेश या भूमीतून मिळाला आहे. मात्र साहित्याच्या व्यासपीठावर आम्ही राजकारणी का? असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला.

आमच्यामुळे साहित्यिकांना प्रेरणा मिळते. आमच्याकडे कवी आहेत, संहिता लिहिणारे आहेत, शीघ्र कवी आहेत. सकाळी टीव्ही लावला की त्यांचे साहित्य ओसंडून वाहते. आम्हाला थोडी जागा मिळाली की हा पवित्र मंच व्यापून कसा घ्यायचा, याचा प्रयत्न आम्ही करतो, असंही फडणवीस म्हणाले.

मराठीला सुरेश भटांनी गजल देऊन एका वेगळ्या उंचीवर नेले. कविवर्य ग्रेस यांनी तरुणाईला मोहित केले. विदर्भ ही साहित्यिकांची भूमी आहे. त्यामुळे, इथे संमेलन होणे महत्त्वाचे आहे. अभिव्यक्ती करण्याकरिता माध्यमांची संख्या देखील वाढली आहे. नव माध्यमांचा हा संक्रमांचा काळ आहे. मात्र, त्याला उंची आणि खोली नाही. त्यामुळे आपली पुस्तकेच खरी साहित्य पोहोचवतात, असंही फडणवीस यांनी नमूद केलं.

मराठीतील साहित्य परंपरा ही मोठी आहे. इतर भाषेत इतक्या मोठ्या प्रमाणात दिसत नाही. समेलनाध्यक्षांनी काही चिंता व्यक्त केल्या त्या योग्य आहे. आपल्या भाषा आपण ज्ञान भाषा करू शकलो नाही. आपण इंग्रजीला प्राधान्य दिल्याने मराठीकडील ओढा कमी झाला. मात्र, नवीन शिक्षा नितीमुळे आपण आता मराठीत शिक्षण देऊ शकणार आहोत. यामुळे, मराठीला पुन्हा चांगले दिवस येतील, अशी आशा फडणवीस यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Chai-Sutta Culture and Health Risks: चहाच्या टपऱ्यांपासून ट्युमरपर्यंत: भारताची ‘चाय-सुट्टा-ब्रेक’ संस्कृती फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या संकटाला खतपाणी घालत आहे का?

Yavatmal: पत्नीच्या खुनात पतीला सश्रम कारावास; बीएनएसस कायद्यांतर्गत प्रकरण निकाली; तक्रारीचे अभिलेख ठरले महत्वाचे

SCROLL FOR NEXT