Sakal Beauty-of-maharashtra
Sakal Beauty-of-maharashtra 
महाराष्ट्र

तरुणींच्या स्वप्नांना मिळतील पंख नवे

सकाळवृत्तसेवा

पुणे - लाखो तरुणींच्या स्वप्नांची दारे ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१९’ या स्पर्धेतूनच उघडतील. सौंदर्य केवळ दिसण्यात नसून बुद्धिमत्तेतही असते, या निकषावर ही स्पर्धा होणार आहे. राज्यातील तरुणींच्या गुणवत्तेला संधी देण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स’तर्फे ‘या स्पर्धेचे आयोजन केले असून हे दुसरे वर्ष आहे. यातील विजेत्यांना ‘सकाळ माध्यम समूहा’च्या माध्यमातून झळकण्याची संधी मिळणार आहे.

राज्यात आठ केंद्रावर या स्पर्धेच्या ऑडिशन्स घेतल्या जातील. ही स्पर्धा १८ ते २५ वयोगटातील अविवाहित तरुणींसाठी असून, त्यासाठी ऑनलाइन पद्धतीनेच नोंदणी करता येणार आहे. सोमवारपर्यंत (ता. २८) नोंदणीची मुदत वाढविली आहे. नावनोंदणी केलेल्या स्पर्धकांची योग्यता पारखून त्यांना ई-मेलद्वारे ऑडिशनसाठी बोलविण्यात येईल. जिल्हास्तरावर या ऑडिशन्स होतील.

यामधून स्पर्धक तरुणींची अंतिम फेरीसाठी निवड होईल. त्यानंतर त्यांचे ट्रेनिंग आणि ग्रुमिंग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात करण्यात येईल. स्पर्धेची अंतिमफेरी १६ फेब्रुवारीला पुण्यात होईल. या स्पर्धेचे फॅशन कोरिओग्राफर आणि टॅलेन्ट ग्रूमर लवेल प्रभू असणार आहेत. ॲमनोरा पार्क टाऊन लाइफस्टाइल पार्टनर असून, ॲमनोरा द फर्न हॉटेल्स अँड क्‍लब हे हॉस्पिटॅलिटी पार्टनर आहेत.

स्पर्धेविषयी माहिती
  नावनोंदणीसाठी - www.sakalbeautyofmaharashtra.in
  संपर्क - ९८९०२९२४९९, ७८८७८६७४४३
  अपडेट्‌स मिळवा - फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्‌विटरवर
  नोंदणीची अंतिम मुदत - सोमवारी (ता. २८) रात्री १२ पर्यंत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT