Sakal India Foundation Sakal
महाराष्ट्र बातम्या

सकाळ इंडिया फाउंडेशन उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती देणार

फाउंडेशनच्या वतीने भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती म्हणून ७५ हजार रुपयांची एक याप्रमाणे सुमारे पंचावन्न शिष्यवृत्त्या देण्यात येतात.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या (Sakal India Foundation) वतीने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती योजना (Scholarship Scheme) जाहीर केली आहे. फाउंडेशनचे शैक्षणिक कार्यातील यंदा साठावे वर्ष आहे. (Sakal India Foundation High Education Student Loan Scholarship)

फाउंडेशनच्या वतीने भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती म्हणून ७५ हजार रुपयांची एक याप्रमाणे सुमारे पंचावन्न शिष्यवृत्त्या देण्यात येतात. भारतात पीएच.डी. करण्यासाठी किंवा परदेशी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २०१९-२० या वर्षापासून प्रत्येकी ७५ हजार रुपयांचे बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती दिली जाते.

ज्या भारतीय पदवीधारक विद्यार्थ्यांना भारताबाहेरील विद्यापीठांकडून किंवा संशोधन संस्थेकडून किमान एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी (२०२१-२२) प्रवेश दिल्याबद्दलचे लेखी पत्र प्राप्त झाले असेल किंवा जे पदवीधर भारतातील विद्यापीठांमध्ये/ राष्ट्रीय संशोधन संस्थेमध्ये पीएच.डी.च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्याबद्दलचे २०१९ किंवा त्या पूर्वीचे विद्यापीठाचे/राष्ट्रीय संशोधन संस्थेचे लेखी पत्र प्राप्त झाले असेल असेच विद्यार्थी या शिष्यवृत्ती करता पात्र समजले जातील.

बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीची रक्कम प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची परतफेड दोन वर्षांत किंवा त्याआधी करणे बंधनकारक आहे. वृत्तपत्र व्यवसायाचे पदव्युत्तर किंवा पीएच.डी.चे शिक्षण घेणाऱ्या तसेच वरील पात्रता अट पुरी करणाऱ्या शिष्यवृत्तीकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यास दहा हजार रुपये इतकी रक्कम परतफेड न करण्याच्या अटीवर मंजूर केली जाईल.

येथे करा अर्ज

पात्र विद्यार्थी फाउंडेशनच्या www.sakalindiafoundation.org या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज भरू शकतात वेबसाइटवर शिष्यवृत्तीचे अर्ज एक जून २०२१ ते ३० जून २०२१ या कालावधीमध्ये उपलब्ध असतील.

अधिक माहितीसाठी संपर्क

सकाळ इंडिया फाउंडेशन

प्लॉट नंबर २७, नरवीर तानाजीवाडी, पीएमपी डेपोजवळ,

साखर संकुल जवळ, शिवाजीनगर, पुणे ४११००५.

संपर्क क्रं.: (०२०) २५६०२१०० (Ext १७४), ६६२६२१७४

Email Id : sakalindiafoundation@esakal.com

Contactus@sakalindiafoundation.org

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: गरिबीची थट्टा, मारहाण अन्... शाळेतच शिक्षक आणि मैत्रिणींचं विद्यार्थिनीसोबत धक्कादायक कृत्य, कंटाळून मुलीचा टोकाचा निर्णय

लाल दहशतवादामुळे आदिवासींपर्यंत विकास गंगा पोहोचली नाही : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

T20 World Cup: नेपाळच्या संघाकडून बलाढ्य इंग्लंडची दमछाक अन् शेवटच्या चेंडूवर अवघ्या ४ धावांनी थरारक विजय

Mumbai Goa Highway Traffic : इंदापूर-माणगाव वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा मनस्ताप, बाह्यवळण मार्गाचे काम खोळंबल्याने समस्या

T20 World Cup: अमेरिकेविरुद्ध भारताचा 'इम्पॅक्ट प्लेयर' कोण? BCCI ने शेअर केला ड्रेसिंग रुममधील BTS Video

SCROLL FOR NEXT