Sakal Sanman Sohala sakal
महाराष्ट्र बातम्या

Sakal Sanman : ‘सकाळ सन्मान’ सोहळा शनिवारी ‘झी टॉकीज’वर

‘सकाळ’ मुंबई आवृत्तीच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील सेवाव्रती संस्था आणि व्यक्तींना ‘सकाळ सन्मान’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

‘सकाळ’ मुंबई आवृत्तीच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील सेवाव्रती संस्था आणि व्यक्तींना ‘सकाळ सन्मान’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

मुंबई - ‘सकाळ’ मुंबई आवृत्तीच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील सेवाव्रती संस्था आणि व्यक्तींना ‘सकाळ सन्मान’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदिरात हा सोहळा दिमाखात पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्याचे प्रक्षेपण येत्या शनिवारी (ता. ११) सायंकाळी ७ वाजता ‘झी टॉकीज’ वाहिनीवर होणार आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल, उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटन, महिला व बालकल्याण विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आदी मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्यास लाभली होती. मनोरंजन विश्वातील तारे-तारकांनी कलाविष्कार सादर केले. अभिनेत्री भूमी पेडणेकर, वाणी कपूर, मानुषी छिल्लर, अमृता खानविलकर आणि अभिनेता सोनू सूद यांच्यासह विविध क्षेत्रांतील सेवाव्रती संस्था व व्यक्तींचा सत्कारमूर्तींत समावेश होता.

अभिनेत्री पूजा सावंत, मृण्मयी देशपांडे, भार्गवी चिरमुले, शिवानी रांगोळे, अभिनेता आदिनाथ कोठारे, विराजस कुलकर्णी व अंकित मोहन यांचा नृत्याविष्कार आणि विनोदवीरांच्या विनोदाच्या फोडणीने कार्यक्रमात धमाल आणली. शाहीर रामानंद उगले आणि त्यांच्या पथकाने सादर केलेल्या पोवाड्याने कार्यक्रमाची सांगता झाली. अभिनेत्री अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी, गायक स्वप्नील बांदोडकर, गायिका सावनी रवींद्र, निर्माती कांचन अधिकारी आणि दिग्दर्शक अभिजीत पानसे कार्यक्रमास उपस्थित होते. हा अनुपमेय असा सोहळा रसिकांना घरबसल्या पाहता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT