Sakal Socila Foundation sakal
महाराष्ट्र बातम्या

सुदृढ मानसिक आरोग्य व निरोगी जग; ऑगस्ट महिन्यात चार मार्गदर्शन ऑनलाईन कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ता. ( २३) , कोरोना किंवा अन्य संक्रमणाच्या व अनिश्चिततेच्या काळात आपल्या आंतरिक मनाचा व सकारात्मक शक्तींचा शोध घेऊन येणाऱ्या बिकट परिस्थितीचा सामना करून , मानसिक ताण - तणाव दूर करून एक निरोगी जग , निरोगी समाज कसा निर्माण होईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. याअनुषंगाणे सकाळ माध्यम समूहातील " सकाळ सोशल फाउंडेशन " च्या we are in this together या मोहिमेअंतर्गत मानसिक ताण - तणाव व एकूणच मानसिक स्वास्थ्याच्या समस्यांच्या समुपदेशनासाठी सुरु करण्यात आलेल्या "सकाळ सोबत बोलूया" या मोफत हेल्पलाइनच्या वर्षपूर्तीनिमित्त ऑगस्ट महिन्यामध्ये प्रत्येक शनिवारी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या चार तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शन कार्यशाळा सर्व वयोगटातील नागरिकांसाठी सशुल्क ऑनलाईन झूम वेबिनार स्वरूपात आयोजित करण्यात येत आहेत.

सकाळ माध्यम समूहातील "सकाळ सोशल फाउंडेशन" च्या वतीने we are in this togetherया मोहिमेअंतर्गत मानसिक ताण- तणाव व्यवस्थापन व एकूणच मानसिक स्वास्थ्य व समस्यांच्या मार्गदर्शनासाठी "सकाळ सोबत बोलूया" ही चोवीस तास मोफत हेल्पलाईन उपक्रम ऑगस्ट २०२० पासून राबविण्यात येत आहे. "सकाळ सोबत बोलूया" या हेल्पलाइनवर गेल्या वर्षभरात राज्यभरातून सुमारे दहा हजार लोकांनी विविध मानसिक स्वास्थ्य व समस्यांच्या मार्गदर्शनासाठी मुक्त सवांद साधला. मागील वर्षभरापासून तज्ञ समुपदेशक, मानसिक विकारतज्ञ, मानसशास्त्रतज्ञ हेल्पलाइनवर फोन करणाऱ्या व्यक्तींना मानसिक आधार देत, त्यांचे योग्य समुपदेशन व मार्गदर्शन करत आहेत. कोरोना संसर्गाच्या व लॉकडाउनच्या काळात आणि नॉर्मल स्थितीतसुद्धा घरांमध्ये, कुटुंबांमध्ये विविध कारणांनी होणाऱ्या ताण - तणावामुळे नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. या हेल्पलाइन मुळे लोकांना व्यक्त होण्यासाठी व योग्य मार्गदर्शनासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

" सकाळ सोबत बोलूया " या उपक्रमास तीन ऑगस्ट २०२१ रोजी , एक वर्ष पूर्ण होत आहे. उपक्रमाच्या वर्षपूर्तीनिमित्त प्रत्येक शनिवारी अनुक्रमे सात , चौदा , एकवीस व अठ्ठावीस ऑगस्ट रोजी , वेगवेगळ्या विषयांवर चार तज्ञ मार्गदर्शकांच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येतील.

१. सात ऑगस्ट रोजी , दुपारी बारा वाजता " मानसिक आरोग्य आणि निसर्गोपचार " याविषयी केरळमधील पांचालीमेडू येथील प्रकृती शक्तीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सिजिथ श्रीधर यांची मार्गदर्शन कार्यशाळा आहे.

२. चौदा ऑगस्ट रोजी, सायंकाळी पाच वाजता "श्वासोच्छवास नियंत्रण , जवळीक व संयमासाठी - हीलिंग व योग " याविषयावर ऑनलाईन अध्यात्मिक अभयारण्य साधना क्लबच्या संस्थापिका मीराबेल डी- कुन्हा शिवज्योती यांची मार्गदर्शन कार्यशाळा आहे.

३. एकवीस ऑगस्ट रोजी , दुपारी बारा वाजता " अय्यंगार योगा - सराव , तत्वज्ञान आणि मानसिक आरोग्य " याविषयी वरिष्ठ अय्यंगार योग शिक्षिका आणि श्रीयोग इन्स्टिट्युट च्या संस्थापिका राजश्री तुपे यांची मार्गदर्शन कार्यशाळा आहे.

४. अठ्ठावीस ऑगस्ट रोजी , दुपारी बारा वाजता " संस्कृत भाषा , संस्कृत मंत्र आणि मानसशास्त्रीय परिमाण " याविषयी भारतीय ज्ञान प्रणाली मानवता आणि सामाजिक विज्ञान विभाग आयआयटी खरगपूर येथे कार्यरत असलेल्या डॉ. अनुराधा चौधरी यांची मार्गदर्शन कार्यशाळा आहे.

प्रत्येक मार्गदर्शन कार्यशाळेसाठी नाममात्र १४९/- रुपये शुल्क आहे. तसेच चारही मार्गदर्शन कार्यशाळेसाठी रजिस्ट्रेशन केले तर चार कार्यशाळांसाठी एकत्रित ४९९/- रुपये शुल्क राहील. या उपक्रमाच्या माध्यमातून शुल्करूपी जमा होणारा निधी हा बेघर - निराधार , मानसिक विकलांग व मनोरुग्णांचा सांभाळ करणाऱ्या वाई तालुक्यातील " यशोधन ट्रस्ट " या स्वयंसेवी संस्थेला मदत म्हणून देण्यात येणार आहे. " यशोधन ट्रस्ट " या संस्थेच्या कार्याची माहिती आपल्याला रविवार ता. ( २५) जुलै रोजी , प्रसिद्ध होणाऱ्या "सप्तरंग" पुरवणीत समाजभान या सदरात पहाता येईल.

वरील मार्गदर्शन कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यासाठी व कार्यशाळांचे शुल्क ऑनलाईन ट्रान्सफर करण्यासाठी खाली दिलेली लिंक किंवा QR कोड ओपन करून रेजिस्ट्रेशन करू शकता. रेजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्या ईमेल आयडीवर झूम वेबिनारची लिंक, आयडी व पासवर्ड मिळेल.

लिंक :-https://www.waitt.in/one-healthy-world-workshop/

QR code

मानसिक समुपदेशनासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट :_

काही लोकांना सातत्याने समुपदेशन करण्याची आवश्यकता असते. ही गरज लक्षात घेऊन चिंता , काळजी, एकटेपणा यामुळे येणारा मानसिक ताण व नैराश्य यामुळे उद्भवणाऱ्या मानसिक समस्या यांवर सर्व वयोगटातील नागरिकांसाठी नाममात्र सशुल्क दरात तज्ञ समुपदेशकांचे मार्गदर्शन घेण्याकरीता we are in this together या वेबसाईट द्वारे ऑनलाईन अपॉइंटमेंट बुकिंगची सुविधा उपलब्ध असते. पण " सकाळ सोबत बोलूया " या हेल्पलाइन उपक्रमाच्या वर्षपूर्तीनिमित्त " गिफ़्ट अ थेरपी " म्हणून पूर्ण ऑगस्ट महिना we are in this together या वेबसाईटद्वारे आपल्या सोयीनुसार , वेळेनुसार व आपल्या समस्येनुसार तज्ञ समुपदेशकांची ऑनलाईन मोफत अपॉइंटमेंट नागरिकांना बुक करता येईल.

असे करा ऑगस्ट महिन्यात समुपदेशनासाठी मोफत ऑनलाईन बुकींग -

खालील लिंक ओपन करून आपली व्यक्तिगत माहिती भरून , आपल्या सोयीनुसार दिवस व वेळ निवडून आपण अपॉईंटमेंट बुक करू शकता.

लिंक - www.waitt.in/therapy/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT