Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha esakal
महाराष्ट्र बातम्या

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात सामंत की राणे? उमेदवार ठरायच्या आधीच भाजपची प्रचारात मुसंडी

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha: शिवसेनेचे सामंत दोन दिवस मुंबईत आहेत. त्यांनी दोन्ही पक्षांतील वरिष्ठांच्या गाठीभेटी घेतल्याचे समजते. यात शिवसेनेने पुन्हा एकदा उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे.

Sandip Kapde

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha:

सावंतवाडी: लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीसाठी शिवसेना आणि भाजपमधील रस्सीखेच सुरूच असली, तरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित मानली जात आहे. शिवसेनेतून उमेदवारीसाठी चर्चेत असलेले किरण ऊर्फ भैय्या सामंत गेले दोन दिवस मुंबईत ठाण मांडून असून त्यांच्याकडूनही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत; मात्र राणे उमेदवार आहेत, असे गृहीत धरून भाजपने प्रचारात मुसंडी मारली आहे.

महायुतीमध्ये लोकसभेच्या नऊ मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यात रत्नागिरी-सिंधुदुर्गचा समावेश आहे. येथून कमळ चिन्हावर उमेदवार उभा करण्यावर भाजप सुरुवातीपासून ठाम आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रभाव टाकू शकणारा उमेदवार द्यावा लागणार असल्याने केंद्रीय मंत्री राणे यांचे नाव पुढे आले.

हा मतदारसंघ पूर्वीच्या युतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे असल्याने शिंदे यांच्या पक्षानेही यावर दावा केला आहे. त्यांच्यातर्फे किरण सामंत यांचे नाव चर्चेत आले. महायुतीतील या चढाओढीत उमेदवारी कोणाला द्यायची, यावरून तिढा अद्याप कायम आहे.

शिवसेनेचे सामंत दोन दिवस मुंबईत आहेत. त्यांनी दोन्ही पक्षांतील वरिष्ठांच्या गाठीभेटी घेतल्याचे समजते. यात शिवसेनेने पुन्हा एकदा उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT