Sambhaji Bhide esakal
महाराष्ट्र बातम्या

Sambhaji Bhide : संभाजी भिडेंचं आज पुन्हा वादग्रस्त विधान; नेहरुंबद्दल बोलतांना म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी काल महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यांच्या विधानानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीका झाली. काही ठिकाणी आंदोलनंही झाली.

आज पुन्हा संभाजी भिडे यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. पंडित नेहरु यांचं अखंड हिंदुस्थानसाठी नखाएवढंही योगदान नाही, असं म्हणून त्यांनी पुन्हा स्वतःकडे वाद ओढवून घेतला आहे.

यवतमाळ येथे शिवप्रतिष्ठानच्या वतीने संभाजी भिंडेंच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मात्र आज त्यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल भाष्य करणं टाळलं. मात्र त्यांनी पुन्हा एकदा पंडित जवाहरलाल नेहरु यांना लक्ष्य केलं.

''नेहरुंना हिंदुस्थानबद्दल प्रेम नव्हतं. देशासाठी नेहरुंचं नखभरही योगदान नाही. तरीही ते पंतप्रधान झाले. चीनबरोबर नेहरुंनी केलेला पंचशील करार हिंदुस्थानला मारक ठरला, त्या करारामुळे भारताचा पराभव झाला. देशाचा ईशान्यकडील भाग चीनला त्यामुळेच गिळंकृत करता आला'' असं भिडेंनी व्याख्यानावेळी बोलतांना म्हटलं.

संभाजी भिडेंनी काल काय म्हटलं होतं?

अमरावतीच्या बडनेर इथं झालेल्या कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडेंनी महात्मा गांधींचे वडील करमचंद गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. करमचंद गांधी हे मोहनदास अर्थात गांधीजींचे खरे वडील नसून ते एका मुस्लीम जमीनदाराचे पुत्र होते, असं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं होतं.

इतकेच नाही तर मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकानं केल्याचा दावा देखील भिडेंनी केला होता. दरम्यान, या विधानामुळं मोठं वादंग निर्माण झालं असून काँग्रेस नेते आक्रमक झाले असून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. भिडेंविरोधात अमरावतीमध्ये गुन्हा देखील दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : ठाकरे मेळाव्यावर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT