संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र बातम्या

Vidhansabha 2019 : संभाजी ब्रिगेडची युतीसह आघाडी, वंचितसोबत बोलणी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - तब्बल 25 वर्षे दुसऱ्यांसाठी लढलो, आता स्वतःसाठी आणि तेही जिंकण्यासाठी आम्ही आगामी विधानसभा निवडणुका लढणार आहेत, असे स्पष्ट करीत संभाजी ब्रिगेडने पहिल्या 15 उमेदवारांच्या नावांची यादी शुक्रवारी (ता.23) जाहीर केली. आघाडी, युतीसह वंचित बहुजन आघाडीसोबतही आमचे बोलणे सुरू असून सोबत घेतले तर ठीक अन्यथा स्वतंत्र निवडणुका लढवू, असे प्रदेश प्रवक्‍ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी सांगितले. 

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी घोषित करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. भानुसे म्हणाले, की राज्यभर संपर्कप्रमुखांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत आम्ही गाफील राहिलो. मात्र, आता नाही. संभाजी ब्रिगेडच्या संसदीय समितीची बैठक नुकतीच प्रदेशाध्यक्ष डॉ. मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर यांच्या उपस्थितीत पुणे येथील कार्यालयात पार पडली. यामध्ये ब्रिगेडने विधानसभेसाठी उमेदवारांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब केले. सर्वच पक्षांबरोबर संभाजी ब्रिगेडचे वरिष्ठ नेते चर्चा करीत आहेत. सन्मानजनक जागा मिळाल्या तर ठीक अन्यथा, स्वबळावर लढणार किंबहुना विविध समविचारी घटकांना एकत्र घेऊन तिसरी आघाडी निर्माण करू. संभाजी ब्रिगेडला निवडणूक आयोगाकडून "शिलाई मशीन' अधिकृत चिन्ह मिळाले आहे. आमचा राजकीय अजेंडा ठरलेला आहे. जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य देऊन विधानसभा निवडणूक मैदानात उतरणार आहोत. पत्रकार परिषदेस प्रदेश संघटक डॉ. बालाजी जाधव, जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, बाबासाहेब दाभाडे, राम भगुरे, वैशाली खोपडे, रेणुका सोमवंशी, रेखा वहाटुळे, रवींद्र वहाटुळे, राजेंद्र पाटील उपस्थित होते. 

यावेळी जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये माणिकराव महादेव पावडे, कारंजा (जि. वाशीम), आशीष नरसिंगराव खंडागळे, आर्वी (वर्धा), राजू ऊर्फ नितीन पुंडलिकराव वानखेडे देवळी (वर्धा), दिलीप किसनराव मडावी, गडचिरोली (गडचिरोली), जगदीश नंदुजी पिलारे, ब्रह्मपुरी, (चंद्रपूर), अरुण नामदेवराव कापडे, वरोरा (चंद्रपूर), भगवान भीमराव कदम, भोकर, धनंजय उत्तमराव सूर्यवंशी, नांदेड उत्तर, (नांदेड), बालाजी माधवराव शिंदे, जिंतूर, (परभणी), टिळक गोपीनाथराव भोस श्रीगोंदा (नगर), डॉ. संदीप माणिकराव तांबारे, उस्मानाबाद (उस्मानाबाद), दिनेश गोपीनाथराव जगदाळे, म्हाडा (सोलापूर), सोमनाथ विजय राऊत, सोलापूर उत्तर (सोलापूर), किरण शंकरराव घाडगे, पंढरपूर (सोलापूर), ऋतुराज जयसिंगराव पवार, तासगाव कवठेमहाकाळ (सांगली) यांचा समावेश आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrakant Patil : अजित दादांच्या मुलावर आता चंद्रकांत पाटील बोलले, जमीन व्यवहाराच्या २२ फायलींची चौकशी सुरू

म्हशी, माडी अन् मिसळ... खुशबू तावडेंने दाखवली कोल्हापूरातील सासरच्या घराची घराची झलक; नेमप्लेटने वेधलं लक्ष

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या वडाळा रोड येथील अशोक हॉस्पिटल परिसरात दोन गटात हाणामारी

Karnataka Politics : काँग्रेस सरकारवर संकट? मुख्यमंत्री बदलाबाबत DK शिवकुमार यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, '2028 मध्ये खऱ्या अर्थानं...'

Security Lapse Kolhapur : गुप्तचर यंत्रणा बिनकामाची? अनोळखी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीजवळ, शेतकरी आंदोलकांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत ताफ्यावर ऊस फेकला...

SCROLL FOR NEXT