Sharad Pawar vs Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar on Ajit Pawar: "मी लहान लोकांवर भाष्य करणार नाही"; शरद पवारांचा अजित पवारांवर निशाणा

पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या गुप्त भेटीवरुन सध्या राज्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरु आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

संभाजीनगर : पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या गुप्त भेटीवरुन सध्या राज्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी अजित पवारांवर भाष्य केलं आहे. "मी लहान लोकांवर भाष्य करणार नाही", अशा शब्दांत त्यांनी अजितदादांवर निशाणा साधला आहे. (Sambhaji Nagar Press Sharad Pawar speaks on Ajit Pawar backdrop of meeting with him at Pune)

पुण्यातील दोन्ही पवार काका-पुतण्यांमधील भेट ही कौटुंबिक भेट होती असं शरद पवार सातत्यानं सांगत आहेत. पण या भेटीची माहिती माध्यमांपर्यंत नेमकी कोणी पोहोचवली आणि त्याचा हेतू काय होता? या सवालावर बोलताना शरद पवार म्हणाले, "मी माध्यमांच्या प्रतिनिधींच्या समोरुन गेलो. माझ्या गाडीची काचही खालीच होती तिथं पोहोचल्यानंतर मी बुकेही स्विकारला, हे माध्यमांच्या प्रतिनिधींनी देखील पाहिलं. माझ्या स्वागतानिमित्त दिलेली फुलं मी घेतली नंतर मी पुढे गेलो त्यामुळं मला कोणाची भीती असण्याचं कारण नाही"

या भेटीदरम्यान शरद पवार खुले पणानं गेले पण अजित पवार गुप्त पद्धतीनं दाखल झाले यातून आपण काय मेसेज दिला? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, "कोण कशा पद्धतीनं आलं यावर मी सांगणार नाही मी फक्त माझ्या पुरत सांगू शकतो. बाकी लहान लोकांच्याबाबत मी भाष्य करत नाही" अशा शब्दांत शरद पवारांनी अजितदादांवर निशाणा साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT