sambhajiraje esakal
महाराष्ट्र बातम्या

'उपोषणास येणाऱ्या मराठा बांधवांना प्रशासनाने अटकाव करु नये'

संभाजीराजे यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला आहे.

सकाळ डिजिटल टीम

संभाजीराजे यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला आहे.

संभाजीराजे यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला आहे. यावेळी आक्रमक पवित्रा घेत, मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीला स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, यासंदर्भात एक महत्वाचे ट्विट करत त्यांनी राज्यशासन आणि प्रशासनाला विनंती केली आहे.

ट्विटमध्ये संभाजीराजे म्हणतात, मराठा (Maratha Reservation) समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी २६ फेब्रुवारीपासून आझाद मैदान येथे जरी मी एकट्याने उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला असला तरी, महाराष्ट्रभरातून (Maharashtra) तिथे येणाऱ्या मराठा बांधवांना पोलिस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा अटकाव करू नये, ही विनंती!, असे आवाहन त्यांनी राज्यशासनाला केलं आहे.

दरम्यान, मराठी आरक्षणविषयी राज्यसरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुंबईत बोलताना ही घोषणा केली होती. 2007 पासून मी संपुर्ण महाराष्ट्र (Maharashtra) पिंजून काढला आहे. मराठा समाजही वंचित घटक आहे. त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं होतं. 5 मे 2021 ला आरक्षण रद्द झालं. मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलनं केली. परंतू अजूनही कोणतीच मागणी पूर्ण नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो परंतू आता मी उद्विग्न झालो असल्याचे वक्तव्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT