Sambhaji Rajes open letter to MLAs in Maharashtra Sambhaji Rajes open letter to MLAs in Maharashtra
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेची ऑफर धुडकावली, संभाजीराजे सकाळीच कोल्हापूरकडे रवाना

सकाळ डिजिटल टीम

येत्या जुलै महिन्यात मराहाराष्ट्रातील सहा राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. यातील पाच जागांवरील उमेदवारांच्या नावाची यादी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, सहाव्या जागेवरून राज्यात राजकारण रंगलंय.

राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजे छत्रपती यांची टर्म संपली आहे. आता स्वराज्य नावाच्या संघटनेमार्फत त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत राज्यातील सर्व आमदारांना पाठिशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रवादीने संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं. मात्र शिवसेनेला अद्याप हा प्रस्ताव मान्य नाही. (Sambhaji Raje Chhatrapati on Rajyasabha)

मातोश्रीवर येऊन शिवबंधन बांधा आणि पठिंबा मिळवा, असा निरोप मुख्यमंत्र्यांनी पाठवल्याची महिती मिळत आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत संभाजीराजेंना संधी देण्यात त्यामुळे राजकारण आणखी तापणार असून संभाजीराजेंनी ही ऑफर अद्याप स्वीकारलेली नाही. त्यातच आता संभाजीराजे सकाळीच कोल्हापूरकडे रवाना झाल्याची माहिती मिळतीय. (Maharashtra Rajyasabha Candidates 2022)

संभाजी राजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला 'मातोश्री'वर जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अपक्ष निवडणूक लढवण्यावर ते अद्याप ठाम आहेत. शिवसेनेत पक्ष प्रवेशाला संभाजी राजेंचा सुरुवातीपासून विरोध होता. सेनेची ऑफर ते स्वीकारणार की नाही, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं. मात्र, आता संभाजी राजे मुंबईतून पहाटेच कोल्हापूरला निघाल्याची माहिती मिळत आहे.

सेनेची ऑफर आणि पवारांची खेळी

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष लढणार असल्याचं संभाजीराजेंनी जाहीर करताच शरद पवार यांनी राष्ट्रवादीकडून जाहीर पाठिंबा देत खेळी केली. राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यानंतर भाजप आणि अन्य मविआ सरकारमधील पक्षांची गोची झाली. त्यातच शिवसेनेने राजेंना पक्षप्रवेश करण्याची ऑफर दिली. यातून राजकारण आणखी वेगळ्या वळणावर गेलंय. सहावी जागा भाजपच्या गोटातून रिक्त होत आहे. विकास महात्मे यांच्या जागी चाचपणी सुरू आहे. मात्र भाजपला संख्याबळाचं समीकरण साधण्यात घाम गाळावा लागणार असल्याने महाविकास आघाडी पाठिंबा देईल, तो उमेदवार राज्यसभेत जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Crisis: महाराष्ट्रात इंधन संकटाचा स्फोट! पेट्रोल-डिझेलसाठी लांब रांगा, अनेक पंपावर ‘नो स्टॉक’ बोर्ड, वाहनचालकांचे हाल

IPL 2026, SRH vs KKR: पॅट कमिन्सने टॉस जिंकला, पण नितीश रेड्डीला का बाहेर बसवला? कोलकाता संघातही झाला बदल; पाहा Playing XI

Hasan Mushrif Gokul Milk Trap : अजित दादा गेले मंत्री मुश्रीफ अडकले चक्रव्यूहात, ‘गोकुळ’मधील किरकोळ चुका बनल्या गंभीर ; ईडी पुन्हा लागणार मागे?

CSK: मुंबईला त्यांच्याच भाषेत उत्तर! CSK ने रचला इतिहास जो कोणत्याही टीमला जमला नाही; 'या' बाबतीत चेन्नई ठरली नंबर १

Nagpur News: बारावीच्या परीक्षेत ‘मास कॉपी’; वर्धा, गोंदिया जिल्ह्यातील २४३ विद्यार्थ्यांवर कारवाई

SCROLL FOR NEXT