sambhaji raje on management of shiv jayanti 2023 programme at shivneri fort CM eknath shinde devendra fadnvis  
महाराष्ट्र बातम्या

Shiv Jayanti 2023 : हे खपवून घेतलं जाणार नाही…; शिवनेरीवर संभाजीराजेंनी व्यक्त केली नाराजी

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरीवरी किल्ल्यावर शासकिय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. यादरम्यान व्हिआयपींसाठी शिवभक्तांची अडवणूक करण्यात आल्याचा प्रकर समोर आला. याप्रकरणी छत्रपती संभाजी राजे यांनी जाहीर नाराजी व्यक्त कली.

संभाजीराजेंनी व्हिआयपीसाठी शिवनेरी गडावर शिवप्रेमींना रोखल्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. जोपर्यंत शिवप्रेमींना प्रवेश दिला जात नाही, तोपर्यंत मीही गडावर जाणार नाही, अशी भूमीका संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केली. शिवनेरीवरील नियोजनाच्या अभावामुळे संभाजीराजे नाराज झाले.

संभाजीराजे यावेळी म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळी निघालो होतो. यावेळी मला शिवभक्तांनी अडवलं. त्यांनी मला व्हिआयपी पासेस का? आम्हला का आडवलं जातं? असे प्रश्न विचारले म्हणून मी निर्णय घेतला की आपण शिवभक्तांच्या सोबत थांबायचं. कापण आपण पुढे गेलो तर चेंगराचेंगरी होऊ शकते.शि

शिवभक्तांना शासकिय कार्यक्रमामुळे ताटकळत थांबावे लागले. यावर नाराजी व्यक्त करत संभाजीराजे म्हणाले की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शासकीय कार्यक्रम करावा. त्यामुळे शिवरायांचे नाव जगभरात पोहचलेच पाहीजे. पण दुजाभाव नको. शासकिय कार्यक्रम १० पर्यंत करा. तोपर्यं लोकांना गडावर सोडू नका. पण इथं आणायचं आणि लोकांना दर्शन घेऊ द्यायचं नाही हे चालणार नाही. हे दरवर्षी होत आहे, असेही संभाजीराजे यावेळी म्हणाले. आम्ही किती सहन करायचं. हा दुजाभाव करू नका. सगळ्यांना दर्शन घेण्याचा अधिकार आहे असेही संभाजीराजे म्हणाले.

आपण शिवाजी महाराजांचे पाईक आहोत. शाकिय कार्यक्रम शांतपणे ऐकू. मी तुमच्या सोबत आहे, असा विश्वास त्यांनी जमलेल्या शिवभक्तांना दिला. शासकीय कार्यक्रम झाल्यानंतर आम्हा सर्व शिवभक्तांना शिवरायांचे दर्शन घेण्याची परवानगी हवी आहे. त्यासाठी नियोजन करा. तुमचा कार्यक्रम होईपर्यंत शिवभक्तांना सोडू नका, पण खाजगी पासेस का? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil : रुग्णवाहिका आणि औषध खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार, सतेज पाटलांचा कोणावर रोख

Rohit Sharma: 'आज फेअरवेल मॅच होती!', गौतम गंभीरच्या कमेंटवर रोहितने काय दिली रिअॅक्शन? पाहा Viral Video

Virginity Test: संतापजनक! आधी कौमार्य चाचणी करा, नंतरच प्रवेश... मदरशाकडून सातवीतील विद्यार्थिनीकडे प्रमाणपत्राची मागणी

Indian Railways Smart Toilet : ट्रेनमधील शौचालये फक्त ५६ सेकंदात स्वच्छ होणार! नवीन तंत्रज्ञान काय? जाणून घ्या...

Bhagvad Gita Lessons in Marathi: दुसऱ्यांच्या 'परफेक्शन'च्या मागे धावू नका; तुमचा स्वत:चा मार्गच आहे चांगला : भगवद् गीतेतील शिकवण

SCROLL FOR NEXT