SANJAY raut eknath shinde 
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut: मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेचा पास मिळाला; संजय राऊत म्हणाले, मी जाणार, पण...

कार्तिक पुजारी

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्री म्हणजे एक फूल दोन हाफ संभाजीनगरमध्ये आहेत. मला संधी मिळाली तर मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत जाऊन त्यांना नक्की प्रश्न विचारणार. पत्रकार परिषदेसाठी पत्रकारांना पास दिले जात आहेत. जे प्रश्न विरोधकांना विचारले जात आहेत, ते सत्ताधाऱ्यांना विचारा. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला मी जाणार आहे. पण मला कोणी अडवायला नको आणि गोंधळ व्हायला नको, असं राऊत म्हणाले आहेत. ( Marathwada Cabinet Minister Meeting)

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेसाठी संजय राऊत यांना पास दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे संजय राऊत पत्रकार परिषदेला जाणार का? असा प्रश्न विचारला जात होता. संजय राऊत यांच्या उत्तरामुळे संभ्रम आणखी वाढला आहे. राऊत यांनी पत्रकार परिषदेला जाण्याची तयारी दर्शवली आहे, पण त्यांच्या जाण्यामुळे गोंधळ निर्माण होणार असेल तर ते जाणं टाळतील, अशी शक्यता आहे.

मी संपादक आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ संपादक आहे. तसेच मी वार्ताहरही आहे. त्यामुळे माझी इच्छा झाली तर मी जाईन. पण मी गेल्यास गोंधळ होणार, असं संजय राऊत म्हणाले. त्यामुळे पत्रकार परिषदेला जाण्याबाबत कोणतंही स्पष्ट वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं नाही.

काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये जवान शहीद झाले आहेत. आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या कार्यालयात उत्सव सादर करत आहेत. हा प्रकार खूप गंभीर आहे. त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे का? आम्ही क्रांती चौकात शिवसेनेचा अभिवादन कार्यक्रम करणार आहोत. चार जवान शहीद झाले त्यांना श्रद्धांजली वाहनार आहोत. या देशासाठी आपले बलिदान देणाऱ्या जवानांना विसरु शकत नाही. हाच आमचा सनातन धर्म आहे, असं संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ संभाजीनगरमध्ये पोहोचलं आहे. मराठवाड्यासाठी या मंत्रिमंडळ बैठकीत जवळपास ४० हजार कोटी रुपयांच्या योजनांची घोषणा केली जाणार आहे. मराठवाडा मुक्सिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी दिनानिमित्त मराठवाड्यातील जनतेला खूष करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शिवाय, दुष्काळामुळे मराठवाड्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यादृष्टीने मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे पाहिलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नाशिकच्या दिलीप गावितला 'सुवर्ण'; Goosebumps आणणारा Video! २ रौप्यपदकांसह भारताने सहाव्या दिवशी पक्की केली ६ पदकं

Moong-Rava Bites: खायला टेस्टी, तब्येतीसाठी बेस्ट; मूग आणि रव्यापासून बनवा हाय-प्रोटिन खुसखुशीत बाईट्स!

पेपरफुटीविरोधी विधेयकावर 'सीजेपी'ची पहिली प्रतिक्रिया; ''सरकारकडून केवळ शिक्षेवर फोकस पण गुन्हा कसा रोखणार?''

दहावी-बारावी उत्तीर्ण तरुणांना नोकरी! सोलापुरात आता ‘या’ कार्यालयात दरमहा दोनदा रोजगार मेळावे; मुलाखतीतून थेट जॉबची संधी, वाचा...

Baramati Smart Village: बारामती तालुक्यातील दहा गावांचा ‘स्मार्ट अँड इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पातून तंत्रज्ञानाधारित सर्वांगीण कायापालट

SCROLL FOR NEXT