Sambhajiraje Chhatrapati 
महाराष्ट्र बातम्या

Sambhajiraje Chhatrapati: संभाजीराजे छत्रपती यांचा भावी 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख! स्वराज्यची राजकीय योजना काय?

Sandip Kapde

Sambhajiraje Chhatrapati: स्वराज्य संघटनेचा उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालयाचे आज नाशिकमध्ये उद्घाटन झाले. माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी कार्यकरत्यांना संबोधित केले. या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी संभाजीराजे छत्रपती यांचा भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले. यावर देखील संभाजीराजे छत्रपती यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, बोर्डवर भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्यामुळे मी आभारी आहे. पण बोर्डवर लिहणे आणि होणे ही गोष्ट वेगळी आहे. माझ्या डोळ्यासमोर एकच अजेंडा आहे  स्वराज्यच्या माध्यमातून जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहचणे. आजची राजकीय परिस्थिती पाहिले तर कोणीच खुश नाही. सत्तेसाठी काहीही सुरु आहे. (Latest Marathi News)

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मी माझी भूमिका काल सविस्तर मांडली आहे. भावना आणि न्याय या दोन्हींचे समेट कसे करता येईल हे महत्वाचे आहे. त्यांनी त्यांची तब्येत सांभाळावी,त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलून पुढे कसे जाता येईल याबाबत चर्चा करावी. माझ्या दृष्टीकोनातून प्रश्न सोडवत असताना जीव देखील महत्वाचा आहे.  

49 मराठा समजाच्या लोकांनी आत्महत्या केली आहे. समाजाचा त्यांच्यावर विश्वास आहे,ते विचार करून निर्णय घेतील. सरकारने देखील आरक्षण देताना टिकणारे आरक्षण द्यावे, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lungi Ngidi Updates: डोक्याला मार लागल्याने अँब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये नेलेल्या एनगिडीची कशी आहे प्रकृती? दिल्लीने दिले अपडेट्स

New Marathi Books : नव्या मराठी पुस्तकांची समृद्ध मेजवानी

Satara Protest: बुलडाणा आमदार संजय गायकवाड वादात; ‘शिवाजी कोण होता’ वाचनावरून साताऱ्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी

Satara Accident: दुर्दैवी घटना! रहिमतपूर येथे शेतकऱ्याचा कालव्यात बुडून मृत्यू; गाळ काढताना घडला अपघात..

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

SCROLL FOR NEXT