Maratha Reservation agitation Esakal
महाराष्ट्र बातम्या

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात बंदची घोषणा; चक्काजामने वाहतूक कोंडी

दसरा चौक येथून वाहतूक बंद असल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati यांची प्रकृती खालावल्याने सकल मराठा समाजाचा आज उद्रेक झाला. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, संभाजीराजे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत दसरा चौक (Dasara Chowk) व रंकाळा स्टॅंड (Rankala Stand) येथे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी मंगळवारी कोल्हापूर (Kolhapur) बंद ठेवण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने (Sakala Maratha Samaj) घेतला आहे. या आंदोलनाला चेंबर ऑफ कॉमर्स नेही पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान आज कोल्हापुरात चक्का जाम आंदोलनामुळे वाहतूकीची कोंडी झाली. दसरा चौक येथून वाहतूक बंद असल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. यावेळी ठिकठिकाणी बॅरिगेस्टस लावण्यात आले होते.

संभाजीराजे मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसले आहेत. मराठा समाजाच्या हितासाठी पाच मागण्यांची अंमलबजावणी त्वरित करावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांच्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने राज्यात अस्वस्थता पसरली. त्याचे पडसाद कोल्हापुरातही उमटले. सकाळी अकरा वाजता रंकाळा स्टँड येथे मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करत सरकारविरुद्ध टीकेची झोड उठवली.

दसरा चौकात ही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याभोवती कडे करून एक मराठा लाख मराठा, संभाजीराजांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, आरक्षण आमच्या हक्काचे अशा घोषणा देण्यात आल्या.

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर भूपाल शेटे, शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजीत चव्हाण, उपाध्यक्ष अजित राऊत, माजी नगरसेवक अजिंक्य चव्हाण, वसंत मुळीक, महेश जाधव, अशोक जाधव, किसन भोसले, ईश्वर परमार, दुर्वास कदम, जयेश कदम, अजित ठाणेकर, राहुल चिकोडे, दिलीप पाटील, शारंगधर देशमुख, अजिंक्य चव्हाण, अजित राऊत, राजू लिंग्रस, श्रीकांत घोडके, हर्षल सुर्वे, अनिल घाटगे, दिलीप सावंत, बाळ घाटगे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT