sambhajiraje eskal
महाराष्ट्र बातम्या

Gram Panchayat Election Result : निवडणुकीत संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेची जबरदस्त एन्ट्री, कुठं-कुठं मिळवला विजय?

स्वराज्य संघटनेनं महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये जोरदार मुसंडी मारलीये.

सकाळ डिजिटल टीम

स्वराज्य संघटनेनं महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये जोरदार मुसंडी मारलीये.

Gram Panchayat Election Result : राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहे. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. आता धक्कादायक निकाल हाती येऊ लागले आहेत.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून संभाजीराजेंनी महाराष्ट्रात वेळोवेळी आंदोलनं केली. यानंतर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी स्वराज्य संघटनेतून (Swaraj Sanghatana) राजकीय आखाड्यात नशीब आजमावून पाहण्याची तयारी सुरू केलीये. या स्वराज्य संघटनेनं महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये जोरदार मुसंडी मारलीये.

ग्रामपंचायत निवडणुकीत स्वराज्य संघटनेनं विजय मिळवल्यानंतर आता महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाच्या माध्यमातून स्वराज्य संघटना जोरदार कामगिरी करेल, असा विश्वास स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांनी व्यक्त केलाय. स्वराज्य संघटनेची ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी घोडदौड सुरू आहे.

धाराशिव येथील सरपंचासह 13 सदस्य निवडून आले आहेत. तर, नाशिकमध्ये सरपंचासह सदस्यपदी कार्यकर्ते निवडून आले आहेत. आतापर्यंतच्या निकालानुसार स्वराज्य संघटनेच्या 3 ग्रामपंचायत विजयी झाल्या आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील गणेशगाव व वासोल गाव तसंच धाराशिव जिल्ह्यातील तडवला ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Scheme : केवायसी सुरू झाल्याच्या अफवेने महिलांची धावपळ; लाडकी बहीण योजनेबाबत अधिकृत घोषणा नसतानाही केंद्रांवर गर्दी

Daund Court : दौंड न्यायालयातील कामकाजावर संपाचे सावट; वेतनश्रेणीच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन

तेजस्वी सातपुतेंची बदली खरातच्या माध्यमातून? रुपाली ठोंबरेंचे गंभीर आरोप; चाकणकरांनाही केले लक्ष्य

Trump Modi Quad meeting: कणखर व्यक्तिमत्व! क्वाड नेत्यांच्या बैठकीत ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक

UP Election: उत्तर प्रदेशात काँग्रेसला हव्यात १०० हून अधिक जागा, नाराज अखिलेश किती जागा देणार?

SCROLL FOR NEXT