Kolhapur Loksabha esakal
महाराष्ट्र बातम्या

Kolhapur Loksabha : संभाजीराजेंची वडिलांसाठी भावनिक पोस्ट; ''एकदाही दिल्लीला न जाता...''

Kolhapur Loksabha 2024 : कोल्हापुरातून काँग्रेसने शाहू महाराज छत्रपती यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने राज्यातील सात उमेदवरांची नावे जाहीर केली. त्यात शाहू महाराजांचं नाव होतं. या उमेदवारीनंतर शाहू छत्रपतींचे पुत्र संभाजीराजे छत्रपती यांनी 'एक्स'वर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

संतोष कानडे

Kolhapur Loksabha 2024 : कोल्हापुरातून काँग्रेसने शाहू महाराज छत्रपती यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने राज्यातील सात उमेदवरांची नावे जाहीर केली. त्यात शाहू महाराजांचं नाव होतं. या उमेदवारीनंतर शाहू छत्रपतींचे पुत्र संभाजीराजे छत्रपती यांनी 'एक्स'वर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

संभाजीराजेंची 'एक्स'वरील पोस्ट

अभिनंदन बाबा... गेले तीन दिवस श्री शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारार्थ मी राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होतो. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या व निबीड अरण्यात वसलेल्या "वाकीघोल" या अत्यंत दुर्गम भागात माझा दौरा होता. परवा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोबाईलला थोडी रेंज आली आणि शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्याची बातमी दिसली. मन आनंदून गेले. लागलीच कोल्हापूरला जाऊन महाराजांना भेटण्याची इच्छा झाली. पण लगेचच जबाबदारीचीही जाणीव झाली. हातातले काम... पुढे दिलेला शब्द.... आणि पुढचा नियोजित दौरा पूर्ण करूनच कोल्हापूरला निघायचे ठरवले.

आज दौरा संपवून घरी आल्यानंतर लगेचच महाराजांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. खरेतर तिकीटासाठी एकदाही मुंबई, दिल्लीला न जाता, कुठल्याही नेत्याकडे तिकीटाची मागणी न करता, केवळ लोकभावना पाहून तीन पक्षांनी एकत्र येत महाराजांना लोकसभा लढण्याची विनंती केली. महाराजांनी आयुष्यभर राजकारणापासून व प्रसिद्धी पासून अलिप्त राहत जे जनसेवेचे कार्य केले आहे, राजघराण्याची झूल न पांघरता लोकशाहीचा पुरस्कार करण्याची जी भूमिका आयुष्यभर जपली आहे, त्याचेच हे प्रमाण आहे. कोल्हापूरची जनता ठामपणे महाराजांसोबत उभी आहे. ही लोकभावनाच महाराजांच्या विजयाची शाश्वती आहे...

काँग्रेसचे सात उमेदवार

१. नंदुरबार- गोवाल पाडवी

२. अमरावती- बळवंत वानखेडे

३. नांदेड- वसंतराव चव्हाण

४. पुणे- रवींद्र धंगेकर

५. लातूर- डॉ. शिवाजीराव कळगे

६. सोलापूर- प्रणिती शिंदे

७. कोल्हापूर- शाहू महाराज छत्रपती

दरम्यान, प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये शाहू छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करु, असंही आंबेडकर म्हणाले.

वंचितने पाठिंबा जाहीर केल्याचे कळताच शाहू छत्रपतींनी प्रकाश आंबेडकरांचे आभार मानले आहेत. ''बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांचे संबंध हे किती जिव्हाळ्याचे होते हे सगळ्यांनाच माहिती आहे. हा दृष्टिकोन ठेवूनच त्यांनी मला हा पाठिंबा दिला असेल असं मला वाटतं.'' अशा शब्दात शाहू छत्रपतींनी आंबेडकरांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

Pune News : खासगी ट्रॅव्हल्स बसेसना पुणे शहरात नवे नियम लागू, नवीन मार्गांची अंमलबजावणी सुरू

SCROLL FOR NEXT