Sameer Wankhede 
महाराष्ट्र बातम्या

Sameer Wankhede: 'आर्यन खानचं नाव शेवटच्या वेळी आरोपींच्या यादीत' ; कॉर्डेलिया क्रुझ ड्रग प्रकरणात नवा ट्विस्ट

समीर वानखेडे यांच्या अडचणीत आणखी वाढ

धनश्री ओतारी

एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कॉर्डेलिया क्रुझ ड्रग प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. आर्यन खानचं नाव शेवटच्या वेळी आरोपींच्या यादीत टाकलं, असा मोठा दावा चौकशी अधिकाऱ्याने केला आहे. (Sameer Wankhede Cordelia Cruz Drug Case investigating officer claim)

कॉर्डेलिया क्रुझ ड्रग प्रकरणात तपासातील त्रुटींची आणि आरोपांची चौकशी आयपीएस अधिकारी ज्ञानेश्वर सिंह करत होते. यावेळी अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या मूळ केस नोटमध्ये बदल करून आर्यन आणि अरबाझ या दोघांची नावे वाढवणात आली, तर काहींची नावे वगळण्यात आली असा दावा आयपीएस अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे.

एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावी याला संधी दिल्याचा देखील प्रतिज्ञापत्रात उल्लेख आहे. गोसावीवर आर्यन खानला अटक न करण्याच्या बदल्यात २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आणि ५० लाख रुपये स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला आहे.

एनसीबीच्या मुंबई कार्यालयातील सीसीटीव्ही फूटेजसोबत छेडछाड केलाचा दावा देखील सिंह यांनी केला आहे.

एनसीबी अधिकारी रेड दरम्यान पंचनामा न करताच मौल्यवान वस्तू ताब्यात घेत असल्याचेही या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आल आहे. चौकशीविरोधात समीर वानखेडे यांनी सेंट्रल अॅडमिनिस्ट्रिव्ह ट्रिब्यूनलकडे दाद मागितली असताना सिंह यांनी हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं. चौकशीअंती वानखेडे यांच्यासह एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT