Sameer Wankhede esakal
महाराष्ट्र बातम्या

Sameer Wankhede : समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार? मिस्टर अॅण्ड मिसेस वानखेडेंची 'ही' जाहिरात चर्चेत!

वानखेडेंच्या या जाहिरातीमुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

वानखेडेंच्या या जाहिरातीमुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

वाशिम : महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) काळात एनसीबीच्या (NCB) माध्यमातून ड्रग्ज तस्कर आणि बॉलीवूड इंडस्ट्रीला हादरवून सोडणारे समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे लवकरच राजकारणाच्या रिंगणात पाऊल ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत वानखेडे कुटुंबीयांकडून कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाहीय.

परंतु, वाशिम जिल्ह्यातील (Washim District) एका वृत्तपत्रात समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांच्या दिवाळीच्या शुभेच्छा देणारी जाहिरात सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. वृत्तपत्राच्या एका संपूर्ण पानावर समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांचं छायाचित्र झळकत आहे. वाशिम जिल्ह्यातील सर्व नागरिक आणि शेतकऱ्यांना वानखेडे परिवाराकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला आनंदमय आणि भराभराटीची जावो, असा मजकूर या जाहिरातीमध्ये (Diwali Advertisement) देण्यात आलाय. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय वर्तुळात यासंबंधी जोरदार चर्चा सुरु झालीय.

'जाहिरात देताना पदाचा विचार करणं गरजचं'

या जाहिरातीमुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वानखेडेंनी या संदर्भात आपल्या विभागाची परवानगी घेतली का? प्रसिद्धीकरिता जाहिरात देताना पदाचा विचार करणं गरजचं आहे, असं काही जाणकार आपलं मत व्यक्त करत आहेत. सिनेअभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला ड्रग्जप्रकरणी अटक केल्यानंतर वानखेडे चांगलेच प्रकाशझोतात आले होते. वानखडे 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय पोलीस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली बदली मुंबईत सीमाशुल्क विभागाचे उपायुक्त म्हणून झाली. त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्रप्रदेश आणि दिल्लीतही पाठविण्यात आलं.

Sameer Wankhede

समीर वानखेडेंच्या भूमिकेकडं लक्ष

वानखेडेंवर माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी गंभीर आरोप केले होते. आता एका वर्तमानपत्रात जाहिरातीच्या माध्यमातून त्यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. परंतु, भारत सरकारमध्ये महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीला जाहिरातीची गरज का? त्यांच्या विभागाकडून त्यांनी तशी परवानगी घेतलीय का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याप्रकरणी समीर वानखेडे काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निळी मफलर डोळ्यावर गॉगल, राज ठाकरे मेळाव्याच्या स्थळी दाखल

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT