sameer wankhede esakal
महाराष्ट्र बातम्या

वानखेडे अन् बहिणीच्या बोलण्यात तफावत? मलिकांचा गंभीर आरोप

नवाब मलिक आणि समीर वानखेडेंचा वाद सुरूच.

सुधीर काकडे

एनसीबीने क्रुझ पार्टीवर केलेल्या कारवाईनंतर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचं नाव चर्चेत आहे. सुरूवातीला त्यांच्या निर्भीड कारवाईमुळे ते चर्चेत होते, मात्र आता चर्चेचं कारण म्हणजे त्यांच्यावर झालेले आरोप. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर सिनेतारकांसोबत मालदीवमध्ये गेले असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर समीर वानखेडेंनी त्यावर स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र मलिक यांनी पुन्हा ते खोटं बोलत असल्याचा आरोप केलाय.

समीर वानखेडे हे कोरोना काळात सिनेतारकांसोबत मालदीवमध्ये आपल्या कुटुंबासह होते असा दावा नवाब मलिक यांनी केला होता. त्यावर समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण देत आपण मालदीवमध्ये होतो असं सांगितलं. मात्र त्यांच्या बहिणीने मलिकांचे सर्व दावे फेटाळून लावले होते. हाच धागा पकडून मलिक यांनी पून्हा एकदा वानखेडेंवर आरोप केलेत.

"सकाळी त्यांची बहीण म्हणाली की माझे बंधू मालदीवमध्ये नव्हते. त्यानंतर आता त्यांनीच सांगितलं की ते मालदीवमध्ये होते. त्यांनी दुबईत गेल्याचं नकारलं. मात्र आपण ट्विटरवर फोटो शेअर केले आहेत." असं म्हणत त्यांनी या प्रकरणात वानखेडे यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT