Sameer Wankhed Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

आर्यन खान प्रकरण : समीर वानखेडेंकडून तपास काढून घेतला

या प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत.

सुधीर काकडे

अमली पदार्थ विरोधी पथकाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आला आहे. एनसीबीच्या दिल्लीतील पथकाकडे आर्यन खानसह आणखी पाच प्रकरणांचा तपास वर्ग करण्यात आला आहे. "मुंबई विभागाकडील सहा प्रकरणांचा तपास दिल्लीतील पथकाकडे सोपवला आहे. हा प्रशासकीय निर्णय आहे", अशी प्रतिक्रिया एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने 'एएनआय' वृत्तसंस्थेला दिली. (Aryan Khan case ncb officer Sameer Wankhede update)

मुंबईजवळ भरसमुद्रात आलिशान क्रूझवर सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी कारवाई केली होती. यामध्ये बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह तीन जणांना अटक करण्यात आली होती. या कारवाईवर संशय व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडेंवर गंभीर आरोप केले होते. त्यामध्ये बोगस जात प्रमाणपत्र, खंडणी, भ्रष्टाचार, कार्यपद्धती आदींचा समावेश होता.

शुक्रवारी एनसीबीने वानखेडेंसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला. आर्यन खानसह एकूण सहा प्रकरणांचा तपास एनसीबीच्या मुंबई विभागाकडून दिल्लीतील पथकाकडे सोपवण्यात आला. एनसीबीचे दिल्लीतील पथक शनिवारी मुंबईत पोहोचणार असून पुढील तपास त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

वानखेडेंवरील आरोप काय होते?

क्रूझ पार्टी प्रकरणी प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे यांच्यावर २५ कोटींच्या खंडणीचे गंभीर आरोप केले होते. क्रूझवरील ड्रग्ज पार्टीचा आयोजक काशिफ खान आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. त्यामुळेच या पार्टीचा आयोजक असूनही काशिफ खानला त्यावेळी ताब्यात घेण्यात आले नाही, असा आरोप मलिकांनी केला होता. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर २७ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील एनसीबीच्या मुख्यालयात समीर वानखेडेंची जवळपास अडीच तास चौकशी करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा भाजपप्रवेश; निकालानंतर १८ दिवसात असं काय घडलं?

Grahan 2026 in India: यंदा भारतात कोणकोणती ग्रहणे दिसतील? सुतक वेळ आणि १२ राशींवरील परिणाम जाणून घ्या एका क्लिकवर

LinkedIn: लिंक्डइनच्या धक्कादायक अहवालाने भारतभर खळबळ; ८४% प्रोफेशनल्स ‘वेट अँड वॉच’ मोडमध्ये, नोकरी शोधापासून दूर राहत करियरला ब्रेक

Organ Donate : छपन्न वर्षांच्या हृदयाची चिमुकलीत धडधडली स्पंदने; अवयवदानामुळे त्या मृत्यूनंतरही जिवंत राहिल्या

Latest Maharashtra News Updates Live: हिंगोलीच्या औंढा शहरात गटविकास अधिकाऱ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड

SCROLL FOR NEXT