samir wankhede google
महाराष्ट्र बातम्या

आर्यन खान प्रकरणातील 'त्या' गंभीर आरोपानंतर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आर्यन खान प्रकरणातील (aryan khan drugs case) साक्षीदार किरण गोसावी सध्या फरार आहे. या प्रकरणात आता एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये एनसीबीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (NCB Officer samir wankhede) यांच्याकडून जीवाला धोका असल्याचा आरोप केला आहे. हा व्हिडिओ किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल (Prabhakar sail video) असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आता समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी ते म्हणाले, ''मी प्रभाकर साईल यांच्या आरोपांना योग्य वेळ आल्यावर उत्तर देईल.'' असं म्हणाले. एका माध्यमाला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हटलंय? -

क्रूझवर झालेल्या छापेमारीवेळी तो किरण गोसावीसोबत होता, असे प्रभाकर साईलने म्हटले आहे. तसेच ''सॅम नावाच्या व्यक्तीला आणि गोसावीला एनसीबी कार्यालयाजवळ भेटताना पाहिले. तसेच आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर शाहरुखच्या मॅनेजरला हे दोघे भेटले. त्यांच्यामध्ये निळ्या मर्सिडीज कारमध्ये बोलणे झाले. हे प्रकरण दाबण्यासाठी हे बोलणं सुरू होते. २५ कोटींमध्ये ही डील झाली होती. त्यानुसार ८ कोटी समीर वानखेडे सरांना द्यायचे आहे आणि उरलेले आपल्याला वाटून घ्यायचे आहेत, असे किरण गोसावी फोनवरून कोणासोबत तरी बोलला होता. तसेच एनसीबीने मला खोट्या पंचनाम्यावर सही करायला लावली'' असे गंभीर आरोप या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT