Buldhana Bus Accident 
महाराष्ट्र बातम्या

Buldhana Bus Accident: 'समृद्धी'वरील अपघात प्रकरणी मोठी अपडेट; चालकाविरोधात गुन्हा दाखल

Sandip Kapde

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहराजवळ झालेल्या भीषण बस अपघातात २५ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. समृद्धी द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला. विदर्भ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपुरहून पुण्याला  जात होती. मात्र वाटेत भीषण अपघात झाला. बसमध्येच २५ जण जळून राख झाले. या भीषण अपघाताने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

शनिवारची सकाळ महाराष्ट्रासाठी धक्कादायक ठरली. बसमध्ये एकूण 33 लोक होते. यापैकी 3 निष्पापांसह २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जण  जखमी झाले आहेत. बसला लागलेल्या आगीमुळे कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही आणि क्षणार्धात सर्व काही संपले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

दरम्यान या प्रकरणी सिंदखेडराजा पोलिसांनी आरोपी शेख दानीश यांच्या विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

शेख दानीश शेख इसराईल  हा विदर्भ ट्रायव्हल्स चा चालक होता. तसेच 279, 304, 337 व 427 आयपीसी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मोटार वाहन कायदा 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT