Samruddhi Accident Esakal
महाराष्ट्र बातम्या

Samruddhi Accident: पिलरजवळ काम करत होतो, अचानक क्रेन कोसळली! बचावलेल्या कामगाराने सांगितलं अपघात नेमका कसा झाला?

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे समृद्धी महामार्गाचं काम सुरु असतानाच मोठी दुर्घटना घडली आहे. पुलाचं काम सुरु असताना गर्डर मशिन कोसळून १८ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर मशिनच्या सांगाड्याखाली काही जण अडकल्याची शक्यता आहे. ही दुर्घटना कशी झाली याची चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देखील जाहीर करण्यात आली आहे.

तर ही दुर्घटना नेमकी कशी घडली आणि त्यावेळी काय स्थिती होती यासंबधीची माहिती त्याठिकाणी काम करणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे. प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे की, 'मी पिलरजवळ काम करत होतो, तेव्हा क्रेन कोसळली, गर्डरही कोसळलं, त्याच्याखाली मजूर दबले गेले. या दुर्घटनेत माझ्या ओळखीचे आणि जवळचे चार जण होते.

काही समजण्याच्या आतच गर्डरसकट क्रेन देखील खाली कोसळली. त्या व्यक्तीने सांगितले की, मी आणि आणखी एक व्यक्ती बाहेर निघाली असंही त्याने पुढे सांगितले आहे.

मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा

या दुर्घटनेत मृत झालेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून दोन दोन लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत केली जाणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर

शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघात हा अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १७ जण मरण पावले आहेत. मृत कामगारांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

Pune Rape Case: पुणे अत्याचार प्रकरणात ट्विस्ट! दोघांची आधीपासूनच ओळख, स्वतःच लिहली धमकी... स्प्रेचा वापर नाही, काय समोर आलं?

Sushil Kediya : मराठीत विचारताच चर्चेतून पळ काढला, ३० वर्षांपासून मुंबईत करतोय काय? कोण आहे सुशील केडिया?

शाळेच्या पहिल्याच दिवशी सातवीतल्या मुलाचा सायलंट हार्ट अटॅकने मृत्यू, नेमकं काय घडलं? CCTV फूजेट आलं समोर

SCROLL FOR NEXT