Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

'समृद्धी महामार्गामुळं विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील'

सकाळ डिजिटल टीम

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं 2 मे रोजी लोकार्पण होणार आहे.

समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. विदर्भातील शेतकऱ्यांच्या (Vidarbha Farmers) आत्महत्या या महामार्गामुळं कमी होतील. शेतकऱ्यांना या महामार्गाचा फायदा होईल, असा दावा एमएसआरडीसीचे अध्यक्ष आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) केलाय. सध्या मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी १८ ते २० तास लागतात. समृद्धी महामार्ग पूर्ण होईल, त्यावेळी मुंबई-नागपूर (Mumbai-Nagpur) हे अंतर आठ तासांमध्ये गाठता येईल, असंही त्यांनी सांगितलं.

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं 2 मे रोजी लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकारांसह समृद्धी महामार्गाची पाहणी केली. पाहणी दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदेंनी ‘सकाळ’शी संवाद साधला. कोरोना काळात महामार्गाचे काम मार्गी लावले. या महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं नाव दिल्याचं समाधान असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

महामार्गामुळं वेळ आणि इंधनाची बचत होईलच. याशिवाय हा मार्ग पर्यावरणपूरक असेल. हा महामार्ग आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना रोजगार मिळेल, शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्यावर प्रक्रिया होईल. या भागात संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यावर आधारित उद्योगधंदेही येतील. या सर्व गोष्टींचा फायदा शेवटी शेतकऱ्यांनाच होईल आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील, असा दावाही एकनाथ शिंदेंनी केलाय.

नियमांचं पालन करुन वाहन चालवल्यास अपघात होणार नाहीत

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात होतात, त्या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणत्या उपाययोजना आहेत? असा प्रश्न विचारला असता शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्ग अपघातमुक्त असेल. यासाठी महामार्गावर विशेष प्रणाली असेल. नियमांचे पालन करुन वाहन चालवल्यास अपघात होणार नाही. मी स्वत: या महामार्गावर गाडी चालवलीये. हा चांगला अनुभव होता. १२० च्या पुढं गाडी चालवली तरी काही अडथळे आले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT