Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg Narendra Modi esakal
महाराष्ट्र बातम्या

Narendra Modi : स्वार्थी नेत्यांमुळं देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होत चाललीय; PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

'स्वार्थी राजकीय पक्षांपासून सावध रहा आणि अशा स्वार्थी राजकीय नेत्यांचा पर्दाफाश करा.'

सकाळ डिजिटल टीम

'स्वार्थी राजकीय पक्षांपासून सावध रहा आणि अशा स्वार्थी राजकीय नेत्यांचा पर्दाफाश करा.'

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचं (Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते लोकार्पण झालं. त्यामुळं समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा 529 किलोमीटरचा टप्पा सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला झाला आहे.

कार्यक्रमाच्या आपल्या भाषणात मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींनी इथं 75 हजार कोटींची विकासकामं सुरू केली आहेत. आज महाराष्ट्राच्या विकासासाठी 11 नक्षत्रांच्या एक महान नक्षत्राचा उदय होत आहे. अमृत ​​महोत्सवाच्या 75 वर्षात 75 हजार कोटींची विकासकामं झाल्याबद्दल महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रातील जनतेचं खूप खूप अभिनंदन, असं मोदींनी म्हटलंय.

मोदी पुढं म्हणाले, 'दुहेरी इंजिनचं सरकार महाराष्ट्रात किती वेगानं काम करतंय याचाच आजचा कार्यक्रम पुरावा आहे. समृद्धी महामार्गामुळं मुंबई ते नागपूर हे अंतर कमी होणार असून, महाराष्ट्रातील 24 जिल्हे आधुनिक कनेक्टिव्हिटीनं जोडत आहेत. संपूर्ण देशाच्या विकासासाठी राज्यांचा विकास महत्त्वाचा आहे.'

स्वातंत्र्याच्या 'अमृत काल'मध्ये देश विकसित भारताच्या महान संकल्पानं पुढं जात आहे. विकसित भारत घडवण्याचा मार्ग ही भारताची सामूहिक ताकद आहे. देशाच्या विकासासाठी राज्याचा विकास हाच विकसित भारत घडवण्याचा मंत्र आहे. गेल्या 8 वर्षांत आमची विचारसरणी आणि दृष्टीकोन दोन्ही बदलले आहेत. आम्ही 'सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास' यावर भर देत आहोत, असंही मोदी म्हणाले.

यावेळी मोदींनी राजकारण्यांवर जोरदार हल्ला चढवला. देशातील तरुणांना माझं आवाहन आहे की, स्वार्थी राजकीय पक्षांपासून सावध रहा आणि अशा स्वार्थी राजकीय नेत्यांचा पर्दाफाश करा. या अशा लोकांमुळं आपल्या देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होत चालली आहे. हे स्वार्थी लोक देशाला आतून पोकळ बनवतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोणताही देश शॉर्टकट मार्गानं जात नाही. देशाच्या प्रगतीसाठी कायमस्वरूपी विकास, कायमस्वरूपी उपाय आवश्यक आहे. यासाठी दीर्घकालीन दृष्टी खूप महत्त्वाची आहे, असंही मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT