MNS Latest political news  
महाराष्ट्र बातम्या

'बाळासाहेब ठाकरे एक विचार आहे कुणाचीही खाजगी मालमत्ता नाही'

बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक करायचं होतं तेव्हा ते पूर्ण हिंदुस्थानचे, आता म्हणता फक्त तुमचेच अस कसं?

सकाळ डिजिटल टीम

बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक करायचं होतं तेव्हा ते पूर्ण हिंदुस्थानचे, आता म्हणता फक्त तुमचेच अस कसं?

एकनाथ शिंदेंसह शिवसेना आमदारांच्या बंडाचा आजचा पाचवा दिवस आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत अनेक घडामोडी वेगाने घडल्या आहेत. दरम्यान, गुवाहाटीला जाणाऱ्या मंत्र्यांचं मंत्रीपद आता धोक्यात आलं असून ते जाण्याचीही शक्यता आहे, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. दरम्यान, बाळासाहेब ठाकेर आणि शिवसेना हे नाव इतर कोणालाही वापरता येणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसेनेनं घेतला आहे. त्यामुळे शिंदे गटाला आता हे नाव वापरता येणार नाही. (MNS Latest political news)

शिवसेनेच्या या भूमिकेवरून आता मनसेने शिवसेनेला टोला लगावला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हा एक विचार आहे. आणि हा विचार कोणत्याही पक्षाची किंव्हा व्यक्तीची खाजगी मालमत्ता असू शकत नाही, असा त्यांनी खडसावून सांगितलं आहे. पुढे ते म्हणतात की, जेव्हा महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक करायचं होतं तेव्हा बाळासाहेब पूर्ण हिंदुस्थानचे होते. आता म्हणता फक्त तुमचेच अस कसं?, असा सवालही देशपांडे यांनी केला आहे.

दरम्यान, सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींनंतर शरद पवार यांची संजय राऊतांनी भेट घेतली. त्यानंतर शरद पवारांचीही या प्रकरणात एन्ट्री झाल्याचं पाहायला मिळालं आहे. शिवसेना आता आमदारांविरोधात आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. या आमदारांवर कारवाई करण्याची सेनेची मागणी जोर धरु लागली आहे. १६ आमदारांच्या निलंबनाची मागणी केली जात आहे. त्यामुळं शिवसेनेत पदावर कोण राहतं, मंत्रीपदावर कोण राहील हे आज संध्याकाळपर्यंत कळणार आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT