politics google
महाराष्ट्र बातम्या

अखेर १६ दिवसांनी देशपांडे, धुरी पोहचले शिवतीर्थवर; राज ठाकरेंची घेतली भेट

गुरुवारी सत्र न्यायालयाने काही अटी-शर्थींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवसांपासून गायब असणारे मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी आज अखेर मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. मनसेच्या या दोन नेत्यांना गुरुवारी सत्र न्यायालयाने काही अटी-शर्थींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आज सकाळी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी 'शिवतीर्थ' येथे दाखल होतं राज ठाकरे यांची भेट घेत चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. (MNS Latest News)

मनसेच्या आंदोलनादरम्यान, शिवाजी पार्क पोलिसांनी या दोन्ही नेत्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी गेल्या अनेक दिवसांपासून गायब होते. पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी पथकही तयार केले होते. मात्र ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते. या दोघांनीही अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर काल या दोघांनाही अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आणि त्यांच्या डोक्यावरील अटकेची टांगती तलवार दूर झाली.

'राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर पोलिसांकडून धरपकड होण्याची शक्यता लक्षात घेऊन देशपांडे व धुरी यांनी आपल्या वाहनात बसून पलायन केले. वाहनचालकाने वाहन अचानक पळवल्याने धक्का लागून एक महिला पोलिस खाली पडली आणि जखमी झाली. देशपांडे, धुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हेतूत: हे कृत्य केले', असा आरोप पोलिसांनी केला होता.

देशपांडे यांना पलायन करण्यास मदत केल्याबद्दल त्यांचे वाहनचालक रोहित वैश्य तसेच, शाखा अध्यक्ष संतोष साळी यांना पोलिसांनी अटकही केली होती. या दोघांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केले होते, तर देशपांडे व धुरी यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केले होते. त्याविषयीच्या सुनावणीअंती न्यायालयाने त्यांचे अर्ज मंजूर केले.

दरम्यान, शिवाजी पार्क पोलिसांनी या प्रकरणी देशपांडे यांच्यासह अन्य आरोपींविरोधात भादंविच्या कलम ३५३ (सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्य करण्यापासून बलपूर्वक रोखणे), २७९ (उतावीळपणे वाहन चालवणे) व ३३६ (दुसऱ्याच्या जिवाला धोका निर्माण करणे) अन्वये एफआयआर दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT