Sandipan Bhumare criticizes Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

मी संजय राऊतांसमोर कधीही लोटांगण घातलं नाही; संदीपान भुमरेंचा पलटवार

सकाळ डिजिटल टीम

'संजय राऊत आमच्यामुळं निवडून आलेत. आमच्या जीवावर त्यांना खासदारकी मिळालीय.'

गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केलीय. संजय राऊतांमुळंच आम्ही शिवसेना सोडली, असं काही बंडखोर आमदारांनी जाहीरपणे म्हटल्यानंतर संजय राऊतांच्या भूमिकेकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. या पार्श्वभूमीवर आज सकाळी संजय राऊतांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बंडखोर आमदारांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिलं.

'महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं तेव्हा स्वत: संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) हे सामना कार्यालयात आले होते आणि माझ्यासमोर त्यांनी लोटांगण घातलं होतं. हवं असेल तर सामना कार्यालयातील व्हिडिओ फुटेज मी दाखवू शकतो.' असा दावा करत राऊतांनी भुमरेंवर निशाणा साधला.

याला उत्तर देताना संदीपान भुमरे म्हणाले, संजय राऊत आमच्यामुळं निवडून आलेत. आमच्या जीवावर त्यांना खासदारकी मिळालीय. संजय राऊतांनी राजीनामा द्यावा आणि जनतेतून निवडून येऊन दाखवावं, असा इशारा भुमरेंनी राऊतांना दिलाय. तसेच मी राऊतांसमोर कधीही लोटांगण घातलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. संदीपान भुमरेंच्या या वक्तव्यानंतर राऊत भुमरेंचं चॅलेंज स्वीकारतात का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT