Sandipan Bhumare sakal
महाराष्ट्र बातम्या

सेनेतील दोन आमदार शिंदे गटाच्या गळाला? मंत्री भुमरेंचा दावा

दत्ता लवांडे

पैठण : शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि विद्यमान सरकारचे रोहयो मंत्री आमदार संदीपान भुमरे यांनी शिवसेनेतील आणखी दोन आमदार फुटतील असा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. तर शिवसेनेतील ते दोन आमदार कोण आहेत? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

(2 MLA's Will Join Shinde Group)

दरम्यान, नव्या सरकारमधील मंत्री संदिपान भुमरे पैठण येथील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा दावा केला असून त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चा सुरू झाल्या आहेत. तर मागच्या काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी पैठण येथे सभा घेत गद्दारांवर निशाणा साधला होता. ईडीच्या भितीमुळे आमदार गद्दारी करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आता मंत्री भुमरेंनी दोन आमदार फुटणार असल्याचा दावा केला असून या दाव्यानंतर शिवसेनेतील फुटणारे दोन आमदार कोण आहेत असा प्रश्न आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी ४० आमदार नेले आणि सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर शिवसेना पूर्णपणे खिळखिळी झाली असून शिवसेनेकडून शिवसंवाद यात्रा, महाप्रबोधन यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे.

यानंतर भुमरे यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली असून शिवसेनेशी निष्ठावंत असलेले आमदारही शिंदे गटाच्या गळाला लागणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान ईडीची भिती दाखवून आमदार फोडण्याचा भाजप प्रयत्न करत आहे असा आरोप शिवसेनेकडून होत आहे. त्याचबरोबर जे आमदार किंवा नेते शिंदे गटात दाखल झाले आहेत त्यांच्यामागील ईडी चौकशीचा ससेमिरा कमी झाल्याचं चित्र असून भुमरे यांनी दावा केलेले दोन आमदार कोण आहेत हे पहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : कोल्हापुरात माॅन्सूनचे धडाक्यात पुनरागमन; पुढच्या काही तासांत मुंबईसह अमरावती, कोकणात पावसाचा जोर वाढणार; कुठे ऑरेंज तर कुठे येलो अलर्ट

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला आज विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार

Ketan Agarwal Killed Case : घटनास्थळी प्रसंगाची पुनर्निर्मिती; लोहगडावर पुतळ्याच्या साह्याने गुन्ह्याची अडीच तास पुनर्तपासणी

Anant Ambani : अनंत अंबानी यांची तिरुमलात सुप्रभात सेवा

Iran America War : आखातात पुन्हा भडका! बहारीन, कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ले; अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचे चोख उत्तर

SCROLL FOR NEXT