Amarnath Yatra Sakal
महाराष्ट्र बातम्या

Video: आजोबांचा स्वॅगच निराळा! पंच्याहत्तरीत बाईकवरुन निघाले अमरनाथ यात्रेला

कोरोनाकाळातही त्यांनी अमरनाथ दौरा चुकवला नाही.

दत्ता लवांडे

सांगली : वय कितीही असलं तरी एखाद्या व्यक्तीची इच्छाशक्ती किती असावी याचं उदाहरण सांगली जिल्ह्यातील एका ७४ वर्षाच्या व्यक्तीने दाखवून दिले आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज तालु्क्यातील एका व्यक्तीने वयाच्या ७४ व्या वर्षी गाडीवर अमरनाथ यात्रा केली आहे. त्यांच्या या यात्रेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जयवंत केदार चव्हाण असं या व्यक्तीचं नाव असून महाराष्ट्रातील मिरज येथील ते रहिवाशी आहेत.

(74 Year Old Man Amarnath Yatra Viral Video)

जयवंत केदार चव्हाण हे दरवर्षी अमरनाथ यात्रा करत असल्याचं त्यांनी या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं. त्यांनी १२ वर्षे सायकलवर अमरनाथ यात्रा केली आहे, त्याचबरोबर ६ वर्षे पायी आणि २०१४ सालापासून मोटारसायकवर ही यात्रा करतात. दरम्यान वयाच्या ७४ वर्षीही यात्रेतील उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना आपल्याला दिसत आहे. यादरम्यान रोज ५०० किमी प्रवास ते करतात असं त्यांनी सांगितलं आहे. मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे यात्रा बंद होत्या पण या काळातही यांनी अमरनाथ यात्रा चुकवली नाही असं चव्हाण यांनी सांगितलं आहे.

चव्हाण यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून ते श्रीनगर मध्ये असताना हा व्हिडिओ काढण्यात आला आहे. त्यांच्या बोलण्यातून या यात्रेबद्दलचा उत्साह स्पष्टपणे दिसतो. दरम्यान त्यांचे वय ७५ च्या घरात असूनही दरवर्षी या यात्रेसाठी 2630 किमीचे अंतर गाडीवर पार करत असल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Veer Sugar Factory: किसनवीर साखर कारखान्यात कामगारांचा उद्रेक, अनेक वर्षांपासून पगार नाही; मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील विरोधात संताप

IND vs WI 1st T20: आज पहिला टी-२०, पण गंभीरांसमोर मोठा पेच! वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन? अर्शदीपच्या कमबॅकसह अशी असेल भारताची Playing XI

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Marathi News Live Updates: ४५ हजार शेतकऱ्यांचे केळी पीक विमा अर्ज नामंजूर; विमा कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

SCROLL FOR NEXT