Sharad Pawar Ajit Pawar Jayant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis : 15 ऑगस्टनंतर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप! राष्ट्रवादीचा मोठा गट अजितदादांसोबत जाणार? जयंत पाटलांचंही नाव चर्चेत

15 ऑगस्टनंतर मोठ्या घडामोडी घडण्याचे दिले जाताहेत संकेत

सकाळ डिजिटल टीम

राज्याच्या राजकारणात २ जुलै २०२३ रोजी मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली.

सांगली : राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर आता पुन्हा एकदा आणखी एका राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे (NCP) दिग्गज नेतेही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा आहे.

१५ ऑगस्टनंतर या घडामोडी घडतील, असे संकेत आहेत. राज्याच्या राजकारणात २ जुलै २०२३ रोजी मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्यावेळी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची, तर अन्य नऊ जणांनी मंत्री म्हणून शपथ घेतली.

एक मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आले आहे. ते या गटाला मिळण्याची शक्यता आहे. एका दिग्गज नेत्याचा यावेळी प्रवेश होणार असल्याचे भाकीत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतरही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासह आमदार मानसिंगराव नाईक (Mansingrao Naik), आमदार सुमन पाटील, आमदार अरुण लाड हे मूळ पक्षासोबत राहिलेत.

मात्र, नव्या होणाऱ्या भूकंपात यापैकी काहीजण अजितदादा गटात सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान, विविध समाज माध्यमांसह काही वृत्तवाहिन्यांनीही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही जाणार असल्याचा सूर व्यक्त केला. याबाबत जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्याशी संपर्क साधला असता, अशा कोणत्याही घडामोडी सध्यातरी नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांचे अजितदादांशी चांगले संबंध आहेत. तसेच ते सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. जिल्हा बँक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी त्यांच्याच मागणीनुसार झाली आहे. त्यावेळी ते संचालक होते. या चौकशीचा अहवाल नुकताच विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे.

हा अहवाल व कारवाईची शक्यता असल्यामुळे आमदार श्री. नाईक सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेण्याची शक्यता वाटते. त्यांच्यासोबत आणखी काही नेते, कार्यकर्ते जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसे झाल्यास सांगली जिल्ह्यातही अजितदादा गटाचे प्राबल्य वाढण्याची शक्यता आहे.

चर्चा निराधार : माने

याबाबत राज्याचे राष्ट्रवादीचे समन्वयक शेखर माने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'या चर्चा निराधार आहेत. राज्यात महाविकास आघाडीची आज (ता. ६) बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर अशा चर्चा हेतुपुरस्सर उठवल्या जात आहेत. यापूर्वीही झाल्या आहेत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT