Shiv Sena’s Sanjay Gaikwad and AIMIM’s Imtiaz Jaleel engage in a heated argument following an assault incident involving an MLA Hostel canteen staff member.  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

AIMIM Imtiaz Jaleel on Shiv Sena MLA Sanjay Gaikwad: ‘’बनियन फाडून लुंगी काढून फटकावलं पाहिजे होतं’’ आमदार निवासातील राड्यावरून जलील यांनी गायकवाडांवर केली होती टीका; जाणून घ्या, आता गायकवाडांनी धमकावल्यावर काय म्हणाले जलील?

Mayur Ratnaparkhe

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad Vs AIMIM Imtiaz Jaleel आमदार निवासातील कँटीनमधील कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्याला त्याचे कपडे काढून मारलं पाहिजे होतं, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कँटीनमध्ये घातलेल्या राड्यावर दिली आहे. तर यावर आता जलील यांना संजय गायकडवाडांनीही धमकीच्या भाषेतच प्रत्युत्तर दिलं आहे.

सर्वप्रथम एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी या घटनेवर मीडियाला प्रतिक्रिया देताना म्हटले की, ''तू असशील आमदार तुझ्या घरचा परंतु तुला अशी गुंडागर्दी करायला पाठवलेलं नाही. खरंच जर तू मर्दाचं पोरगं असला असता तर तू विधिमंडळाच्या सभागृहात उभा राहून, जे गरिबांच्या पोटावर लाथ मारून तुम्ही तुमचे खिसे भरताय त्याबाबत प्रश्न विचारले पाहिजे होतं.''

तसेच ''तुला थोडंफार अन्न काय खराब झालेलं दिसलं तर तू अशाप्रकारे एका गरीब, लाचार, असहाय्यला बुक्का मारणार का? मी तर तो जो वेटर होता, त्याला म्हणून इच्छित होतो की तू बघितलंही नव्हतं पाहिजे की तो कोण आहे, त्याची बनियन फाडून, लुंगी ओढून त्याला नग्न करून तिथंच मारलं पाहिजे होतं. कारण, त्यांना तीच भाषा समजते.'' अशा शब्दांत जलील यांनी गायकवडांवर निशाणा साधला होता.

यावर संजय गायकवाड म्हणाले, ''इम्तियाज जलील म्हणतोय की मी जर त्याच्या(वेटरच्या) जागी असतो तर मी त्यावेळी...इम्तियाज जलील भाई तुम्ही त्या हॉटेलचं कंत्राट घ्या आणि मग ते अन्न खाऊ घालून दाखवा, त्याला तर दोनच बुक्के लागले, तुला तर असं मारेन.. असं मारेन की पुन्हा तू हॉटेल चालवायच्या लायकीचा राहणार नाहीस.''

तर संजय गायकवाडांनी अशाप्रकारे धमकावल्यावर इम्तियाज जलील यांची पुन्हा यावर प्रतिक्रिया आली आहे. जलील म्हणाले, ''गायकवाडांचा मारामाऱ्यांचा इतिहास आहे. जर ते मला धमकी देत असतील, तर त्यांनी मला वेळ आणि जागा सांगावी. त्यांना कष्ट घ्यायची गरजही पडणार नाही मी स्वत: तिथे पोहचेन. मला संजय गायकवाडशी काही घेणंदेणं नाही, पण जर तुम्ही चुकीचं करत असाल तर मी त्या गरीब व्यक्तीसोबत उभा राहणारच.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता संभ्रम नको...राजकीय युती गरजेचीच! संजय राऊतांची 'रोखठोक' भूमिका, मुखपत्रातून मनसेला घातलीये 'ही' साद

मोठी बातमी! वर्षा गायकवाडांकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी; 'या' तीन नामवंतांनाही मिळाली संधी

खलनायक ते राजकारणी: ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचा प्रवास थांबला; 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Lung Health Exercises: तरुण वयातच वाढतोय फुफ्फुसांचा धोका! हे 4 व्यायाम ठरतील तुमचे रक्षक

Latest Marathi News Updates : लाडक्या बहिण योजनेमुळे विकास निधी येण्यास विलंब - मंत्री दत्तात्रय भरणे

SCROLL FOR NEXT