hasan mushrif, satej patil, sanjay mandlik esakal
महाराष्ट्र बातम्या

तो मी नव्हेच नेत्यांचा पवित्रा; अदानी-अंबानीचा फैसला मतदारच करतील

संजय मंडलिक; राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी मेळावा

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज : जिल्ह्यातील राजकारणात सर्वच आपल्याकडे असावे यासाठी अदानी, अंबानी (Adani, Ambani) प्रवृत्ती सरसावली आहे; पण आरोप होताच तो मी नव्हेच असा पवित्रा कारभारी नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीच्या (KDCC Bank Election) निमित्ताने मतदारांनीच अदानी-अंबानीचा फैसला करायचा आहे, असे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी आज येथे केले. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीतील राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचा (Rajarshi Shahu Shetkari Parivartan Vikas Aghadi) प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. येथील विनायक प्लाझा सांस्कृतिक सभागृहात मेळावा झाला.

खासदार मंडलिक म्हणाले, ‘‘शिवसेनेची ताकद लक्षात घेऊन तीन जागांची मागणी केली; पण नेत्यांनी स्वतःच्या सोयीचे धोरण अवलंबिले. अखेर स्वाभिमानासाठी परिवर्तन आघाडी अस्तित्वात आली. संघर्षातून प्रस्थापितांविरोधात सर्वसामान्य उमेदवारांची ही लढाई आहे. आपल्या आघाडीची भूमिका मतदारापर्यंत पोहचवल्यास यश नक्की आहे.’’

संघर्षातून प्रस्थापितांविरोधात सर्वसामान्य उमेदवारांची ही लढाई आहे. आपल्या आघाडीची भूमिका मतदारापर्यंत पोहचवल्यास यश नक्की आहे.’’

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘‘सत्ताधारी आघाडीकडून व्यासपीठावर पक्षीय जोडे बाजूला ठेवण्याची भाषणे ठोकली जात आहेत. प्रत्यक्षात विरोधी कृती सुरू आहे. आमिषे, शपथा, टोकन यातून बँक आपल्याच ताब्यात कशी राहील, यासाठी खटाटोप केला जात आहे. सोईच्या भूमिकेमुळे सत्ताधारी कारभाऱ्यांविरोधात मोठा रोष आहे.’’

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, ‘‘ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांचा रोजचा दिवस भाजप प्रदेशाध्यक्ष चद्रकांत पाटील आणि समरजित घाटगे यांच्यावर आरोप केल्याशिवाय जात नव्हता; पण जिल्हा बँक निवडणुकीने काय जादू केली, हे दोघेही त्यांच्या आघाडीच्या प्रचार पत्रकावर झळकले.’’

सुरेश कुराडे म्हणाले, ‘‘स्वाभिमानी नेतृत्व सदाशिवराव मंडलिक यांच्या विचारांची परिवर्तन आघाडी आहे. स्वार्थासाठी कार्यकर्त्यांचा बळी देण्याच्या प्रवृत्तीला विरोध म्हणून खासदार मंडलिक यांनी भूमिका घेतल्याने उमेदवारी स्वीकारली.’’

उमेदवार उत्तम कांबळे, विश्वास जाधव, रवींद्र नरके यांच्यासह शिवसेनेचे प्रभाकर खांडेकर, संतोष चिकोडे, अखलाक मुजावर, अशोक खोत यांची भाषणे झाली. ज्योतिर्लिंग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रियाज शमनजी यांनी आभार मानले.

गडहिंग्लज कारखान्याबाबत दुजाभाव...

जिल्ह्याची आर्थिक शिखर संस्था म्हणून कार्यक्षेत्रातील शेतकरी आणि प्रक्रिया संस्थांना पाठबळ देण्याची जबाबदारी जिल्हा बँकेवर आहे; पण बँकेच्या कारभाऱ्यांनी मदतीतही दुजाभाव केला. आपल्या सोईच्यांना मदत तर विरोधातील संस्थांना ठेंगा दाखविला. जिल्हा बँकेने गडहिंग्लज कारखान्यालाही मदत नाकारून दुजाभाव करत येथील शेतकरी आणि कामगारांना वेठीस धरले, असा आरोप खासदार संजय मंडलिक यांनी केला.

तालुकावार मतमोजणीस विरोध

गडहिंग्लज : जिल्हा बँक निवडणुकीत मतमोजणीबाबत गोपनियतेचा भंग करणारा निर्णय निवडणूक विभागाने घेतला आहे. विकास संस्था वगळता इतर गटातील तालुकानिहाय उमेदवारांची मते जाहीर करण्याची पद्धत मतदाराच्या अधिकारावर गदा आणणारी आहे. सत्ताधाऱ्यांना सोईच्या पद्धतीला राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचा विरोध आहे. त्यामुळेच निवडणूक अधिकाऱ्यांची तक्रार करणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी आज येथे दिली. राजर्षि शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Recruitment : जिद्दीला सलाम! गवंडी काम करत धरणग्रस्त शब्बीर सय्यद यांची मुंबई लोहमार्ग पोलीस भरतीत चमकदार झेप

Who is Krish Bhagat? ३ दिवसांपूर्वी रिप्लेसमेंट, आज Mumbai Indians कडून पदार्पण; आमदाराचा पुतण्या IPL 2026 गाजवण्यासाठी सज्ज

Maharashtra Police Transfers : कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या एसपींची बदली, पोलिस प्रशासनात मोठे बदल

Nashik Crime : भोंदू खरातला पाचव्या गुन्ह्यात २३ पर्यंत कोठडी; बचावपक्षाचा जोरदार विरोध

Chakur Crime News: नवऱ्याच्या प्रेयसीला फसवण्यासाठी चुलतीकडून पुतण्याचा खून

SCROLL FOR NEXT