Sharad-Pawar-NCP
Sharad-Pawar-NCP 
महाराष्ट्र

80 वर्षाच्या तरुणाने पुन्हा बांधली राष्ट्रवादीची मोट I Election Result 2019

संजय मिस्कीन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विश्वाासार्हतेला 2014 पासून घरघर लागली होती. राज्याच्या राजकारणात सर्वाधिक टीकेचा धनी हा पक्ष होता. ग्रामीण महाराष्ट्रात प्रचंड वरचष्मा असलेल्या या पक्षाची त्यावेळेपासून वाताहत सुरू झाली. ज्या नेत्यांनी पंधरा वर्षे पक्षात राहून सत्ता उपभोगली, त्यातील अनेक नेते, आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली.

पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे वय, प्रकृती पाहता या पक्षात आमदारांचे मन रमत नव्हते. पंधरा वर्षाच्या सत्तेत राहूनही 2014 मध्ये जेमतेम 41 आमदार पक्षाचे निवडून आले. यामध्ये बहुतांश आमदार स्वयंभू होते. कोणत्याही लाटेत विजयी होण्याची ताकद त्यांच्याकडे होती. मात्र, या एक्केचाळीसपैकी 25 आमदारांनी पवारांची साथ सोडली.

भाजपच्या मेगाभरतीत एकेक करून राष्ट्रवादीचे आमदार सहभागी होत असताना आता पक्षाचे भवितव्य काय, याबाबत तर्कवितर्क लढवले गेले. मात्र, शरद पवारांनी प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. खासदार अमोल कोल्हे, अमोल मिठकरी या नव्या दमाच्या नेत्यांसोबत अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या मुरब्बींनी महाराष्ट्रात आक्रमक प्रचार सभा घेतल्या. स्वत: पवारांनी तब्बल 67 सभा घेत राज्यातला शेतकरी, युवकवर्ग जोडला.

'ईडी'च्या कारवाईनंतर पवारांचा स्वाभिमानी बाणा महाराष्ट्राला भावला, अन्‌ राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पेटून उठला. त्याचा फायदा उठवत पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला. भाजपच्या आक्रमक प्रचाराला अंगावर घेत निवडणुकीचा संपूर्ण फोकस शरद पवारांवर अशी रणनिती आखली. परिणामी राज्यातल्या तरुण मतदारांवर शरद पवार नावाने गारुड केले. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत सहानुभूतीही तयार झाली. 

केवळ 17 आमदारांच्या बळावर राष्ट्रवादीने 56 जागा जिंकल्या. पवारांच्या झंझावाताने सतरावरून 56 आमदार केले, हे निर्विवाद सत्य आहे. राष्ट्रवादीचा पश्चिम महाराष्ट्राचा बालेकिल्ला भाजपने ढासळवल्याचे चित्र होते. पण, तो परत मिळवण्यात पवारांना यश आले. राष्ट्रवादीचे तब्बल 29 आमदार येथूनच विजयी झालेत.

उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि जळगावमध्ये राष्ट्रवादीने 9 जागा पटकावल्या. विदर्भात 5, तर मराठवाड्यात 7 जागांवर विजय मिळवत बाजी मारली. कोकण आणि मुंबईत या पक्षाला जेमतेम तीन जागांवर समाधान मानावे लागले. सूत्रबद्ध प्रचार, आक्रमक वक्त्यांची फळी, नव्या चेहऱ्यांना संधी, युवकांना साद घालणारे मुद्दे यावरच राष्ट्रवादीने भर दिला. शरद पवारांच्या निरंतर परिश्रमाला मतदारांनी साथ दिल्याने राष्ट्रवादीने यश अक्षरशः खेचून आणले, हेच खरे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलला राजीनाम्याचे आदेश, पालकांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT