Shivsena Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: सेनेची चाल, राठोडांना धक्का; सुनील महाराजांच्या हाती शिवबंधन

यामुळे बंजारा समाजात फूट पडून संजय राठोडांना धक्का बसणार आहे

दत्ता लवांडे

यवतमाळ : शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आता दंड थोपटले असून बंजारा समाजातील मते आपल्याकडे वळवण्यासाठी बंजारा समाजाचे आणि पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी शिवबंधन बांधले आहे. तर बंजारा समाजाला फक्त उद्धव ठाकरे न्याय देऊ शकतात असं मत सुनील महाराजांनी व्यक्त केलं आहे.

(Banjara Community Sunil Maharaj Enters In Shivsena)

दरम्यान, सुनील महाराज हे बंजारा समाजाचे आणि पोहरादेवीचे महंत असून त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे आता संजय राठोडांच्या गटातल्या नेते आणि कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधल्याने येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांत त्यांना मोठा धक्का बसणार असून त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून आव्हान मिळणार असल्याच्या चर्चा आहेत.

बंजारा समाजासाठी शिवसेवा संकल्प दौरा करणार असल्याचं सुनील महाराजांनी सांगितलं आहे. बंजारा आणि बहुजन समाजाला शिवसेनाच न्याय देऊ शकते असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. या कार्यक्रमानंतर शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बंजारा समाजातील पोहरादेवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात लढण्यासाठी शिवेसनेची ही मोठी खेळी असल्याचं बोललं जातंय. पुजा चव्हाण प्रकरणानंतर आणि शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर बंजारा समाजात नाराजी असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मास्टरस्ट्रोक खेळत महंतांनाच आपल्याकडे वळवून घेतल्याने पुढील राजकीय समीकरणे कशी असतील याकडे लक्ष लागलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: ''रस्त्यावरील सर्व श्वान हटवण्याचे आदेश दिलेले नाहीत'', सुप्रीम कोर्टाने दिलं स्पष्टीकरण

Ahilyanagar News : "पुस्तक, निसर्ग आणि माणूस वाचणे आयुष्यभर आवश्यक"– युवा साहित्य संमेलनात मनोज बोरगावकरांचे विचारमंथन!

Viral News : चोरांवर भारी पडली मुंबईची नारी ! पोलिसांनी हात झटकले पण अंकिताने वाराणसीत शोधला चोरी गेलेला फोन, सोशल मीडियावर होतेय कौतुक

Nashik Municipal Election : पॅनलमध्येच दगाफटका? नाशिक मनपा निवडणुकीत उमेदवारांना आता 'क्रॉस वोटिंग'चे टेन्शन

EPFO कडून ट्रान्सजेंडर समुदायाला ऐतिहासिक दिलासा! नाव-लिंग बदल आता अडथळ्याविना होणार, नवे नियम लागू

SCROLL FOR NEXT