Sanjay Rathod said Dont slander me political news 
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Rathod : माझी बदनामी करू नका आणि रॉंग बॉक्समध्ये टाकू नका; चौकशीत सर्व सत्य समोर येईल

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : बंजारा समाजातील एका मुलीने आत्महत्या केल्याचे मला व बंजारा समाजाला दुख आहे. पूजा चव्हाण हिच्या कुटुंबीयांच्या दुखात मी आणि बंजारा समाज सहभागी आहे. माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. चव्हाण हिच्या मृत्यूवरून घाणेरडं राजकारण करण सुरू आहे. हे चुकीच आहे. मी आपणास विनंती करतो माझी बदनामी करू नका, असे वनमंत्री संजय राठोड प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

राज्याचे वनमंत्री संजय राठोड तब्बल १४ दिवस भूमिगत झाल्यानंतर मंगळवारी प्रथमच प्रसारमाध्यमांच्या समोर आले. पोहोरादेवी गडावर पोहोचल्यानंतर त्यांनी जगदंबा देवीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी सेवालाल महाराजांच्या समाधीचे घेतले दर्शन घेतले. तसेच रामराव महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संबंध साधला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमानवरच खापर फोडले.

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येचे मला दुख आहे. चव्हाण कुटुंबीयांच्या दुखात मी सहभागी आहे. याप्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी सुरू केली आहे. पोलिसांच्या चौकशीत सत्य समोर येईल. याव्यतिरिक्त या प्रकरणावर मला काहीही बोलायचं नाही. या घटनेमुळे बंजारा समाजाला दुख झाल आहे. विरोधकांकडून घाणेरडे राजकारण करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

माझी बदनामी करण्याचा प्रयत्न

पूजा चव्हाण प्रकरणावरून माझी आणि कुटुंबाची बदनामी करण्याचा घाणेरडा प्रयत्न सुरू आहे. प्रसारमाध्यमांवर माझ्याबद्दल बरेचकाही बोलले जात आहे. एका घटनेत माझ नाव आल्यामुळे मला रॉंग बॉक्समध्ये टाकू नका असेही ते म्हणाले.  राजकारण
दुखी आहे, उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न, सत्य नाही

फोटाच काय

मी एक नेता आहे. समाजासाठी मी कार्य करीत असतो. यामुळे अनेकांशी मी फोटो काढले आहे. याचा अर्थ या प्रकरणात माझा सहभाग आहे अस नाही. फोटोवरून माझ्यावर शंका घेऊ नका, असेही वनमंत्री संजय राठोड म्हणाले.

मुंबईतून काम सुरू होते

मी १४ दिवस काही गायब झाल नव्हतो. मुंबईतील माझ्या कार्यालयातून माझे काम सुरू होते. मागील दहा दिवसांपासून मी कुटुंबीयांशी संवाद साधत होते. यपुढेही माझे काम सुरू राहणार असल्याचे संजय राठोड म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT