sanjay raut and Pravin raut arrest in patra chawl scam is illegally said pmla court bail order
sanjay raut and Pravin raut arrest in patra chawl scam is illegally said pmla court bail order  Sakal Digital
महाराष्ट्र

Sanjay Raut Bail : PMLA कोर्टाने 'ईडी'ला झापलं! राऊतांची अटक बेकायदेशीर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तब्बल १०० दिवसांपासून तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आज अखेर पीएमएलए कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. यानंतर आज पीएमएल कोर्टाने ईडीवर ताशेरे ओढले असून संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या अटकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. PMLA कोर्टाने ई़डीने या प्रकरणात आपल्या मर्जीने आरोपी निवडले असून तसेच संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना बेकायदेशीरित्या अटक केली असल्याचे म्हटले आहे.

विशेष पीएमएल कोर्टाने संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या जामिनासाठी १२२ पानांचे आदेश काढले असून याच्या १२० पानावर १५३ या पॉंइटमध्ये लिहीलेलं आहे की, कोर्टाला असे वाटते की हे दोन्ही आरोपींना बेकायदेशीरित्या अटक केली आहे. तसेत राकेश वाधवान आणि सारंग वावधान हे मुख्य आरोपी असूनही त्यांना अटक केली नही असे कोर्टाच्या आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा : बातम्या, टिप्सचा गुंतवणुकीवर नका होऊ देऊ परिणाम

या प्रकरणात संजय राऊत हे मुख्य सुत्रधार असल्याचे ई़डीकडून सांगण्यात येत होते. तसेच प्रवीन राऊत यांनी जे काही केलं ते संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार केलं असल्याचे ईडीने म्हणणे आहे. मात्र आता कोर्टाने या दोघांना केलेली अटक ही अवैध असल्याचे सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: देशभक्तांमध्ये सर्वजण येतात... आरोप करणारे देशद्रोही; उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार!

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

Latest Marathi News Live Update : आप खासदार राघव चढ्ढा दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT